SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकाच रिचार्जमध्ये चालणार घरातील चार फोन; जास्तीचा डेटा आणि फ्री ओटीटी प्लॅटफॉर्म मिळणार ‘या’ डेटा प्लॅनमध्ये

एअरटेल ही देशातील जिओ नंतरची सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या जिओ आणि एअरटेलमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. एअरटेल ग्राहकांना Prepaid आणि ost paid असे दोन्ही प्लान ऑफर करते. ब्रँड वेगवेगळ्या प्लँन्स अंतर्गत ग्राहकांना सेवा देते. कंपनीने सध्या टेलिकॉम क्षेत्रात सुरु असणारी स्पर्धा लक्षात घेता एक चांगला प्लॅन ऑफर केला आहे. यामध्ये एका महिन्याची मुदत असणार आहे. हा प्लॅन फॅमिली रिचार्ज असणार आहे. हा प्लॅन एक पोस्टपेड प्लॅन असून यामध्ये युजर्सला अनेक फायदे मिळतात. या प्लॅनला कंपनीचा सर्वात महागडा प्लॅन म्हणून देखील पाहिलं जातं आहे. 1,599 रुपये किंमत या प्लॅनची आहे.

युजर्सला या प्लॅनमध्ये 250 GB डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा रिचार्ज केल्यानंतर तुम्ही एकाच वेळी तीन कनेक्शन जोडू शकता. इतर तीन लोक तुमचा प्लॅन शेअरिंगमध्ये वापरू शकतात. यामध्ये अतिरिक्त कनेक्शनला 30 GB डेटा मिळेल. सोबतच या डेटा प्लॅनमध्ये 200 GB डेटा रोलओव्हरसह येतो. सर्व युजर्सना अनलिमिटेड कॉलच्या सेवेचा लाभ मिळेल. आणखी एक वैशिष्टय म्हणजे युजर्सना Airtel Thanks अँपचा लाभ घेता येतो. त्यातच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बाबतीतही युजर्सना गुड न्यूज मिळते. युजर्सना Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar आणि इतर OTT लाभही अगदी मोफत घेता येईल.

Advertisement

ओटीटीच्या प्लॅनमध्ये मात्र अतिरिक्त डेटा महाग आहे. . जर तुम्ही फॅमिली प्लान शोधत असाल तर हा रिचार्ज प्लान एक चांगला पर्याय असू शकतो. जे सध्या उत्तम फॅमिली डेटा प्लॅनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही ऑफर अत्यंत चांगली आहे. विशेष म्हणजे Airtel फॅमिली पोस्टपेड प्लान हा अवघ्या 999 रुपयांपासून सुरु होतो.

Advertisement