SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, महागाई भत्त्यात पुन्हा होणार ‘इतकी’ वाढ..?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. सातव्या वेतन आयोगानुसार, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर हा ‘डीए’ 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत..

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘एआयसीपीआय’ निर्देशांकानुसार (AICPI Index) ठरवला जातो.. एप्रिलमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांक 127 अंकांवर गेला होता. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 7.79 टक्के, म्हणजेच 8 वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. याआधी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांकांत घसरण झाली होती.

Advertisement

जानेवारीमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांक 125.1, तर फेब्रुवारीत 125 अंकावर होता. मार्चमध्ये त्यात एका अंकाने वाढ होऊन तो 126 वर पोहोचला. एप्रिलच्या आकड्यांनुसार, ‘एआयसीपीआय’ निर्देशांक आता 127.7 वर पोहोचला आहे. त्यात 1.35 टक्के वाढ झाली आहे.

मोदी सरकार आजच (ता. 1) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 वरुन 39 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात 34,000 रुपयांपेक्षा अधिक वाढ होणार असल्याचे सांगितले जाते..

Advertisement

किती पगार मिळणार..?

मोदी सरकारने ‘डीए’मध्ये 5 टक्के वाढ केल्यास, कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Salary) 56,900 रुपये असेल, तर महागाई भत्ता 22,191 रुपयांपर्यंत मिळेल. सध्या 34 टक्के दराने कर्मचाऱ्यांना 19,346 महागाई भत्ता मिळतो. त्यात 2,845 रुपयांची वाढ होईल. या हिशेबाने वार्षिक वेतनात 34,140 रुपयांची वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवून मिळतो.. काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे ‘डीए’ 34 झाला होता.. आता त्यात 5 टक्के वाढ झाल्यास, ‘डीए’ 39 टक्क्यांवर जाणार आहे.. देशातील 50 लाखांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी व 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement