SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अपघात झाल्यास मोबाईल वाचवेल जीव, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्मार्टफोन..?

सध्या प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन पाहायला मिळतो.. त्यातील विविध अ‍ॅप्समुळे (Apps) महत्त्वाची कामंही झटक्यात होऊ लागली आहे.. अगदी आपत्कालीन परिस्थितीतही स्मार्टफोनमुळे तात्काळ मदत मिळू शकते. एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांपर्यंत तातडीनं मदत पोहोचणं गरजेचं असतं. अशा वेळी स्मार्टफोन तुमच्या मदतीला आला तर..?

हो.. आता हे शक्य आहे.. ‘अ‍ॅपल’चा आयफोन (iphone) आणि अ‍ॅपल स्मार्टवॉचच्या (Apple Smartwatch) माध्यमातून अनेक अपघातग्रस्तांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यास मदत झालीय.. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.. याबाबत ‘अ‍ॅपल’ची ‘एसओएस’ (SOS0 सुविधा खूप लोकप्रिय आहे.

Advertisement

आता ‘गुगल पिक्सेल’ (Google Pixel) या स्मार्टफोनमध्ये तसेच फीचर उपलब्ध झाले आहे.. ‘कार क्रॅश डिटेक्शन’ (Car Crash Detection) असं या फीचरचे नाव आहे.. सध्या केवळ ‘गुगल पिक्सेल’वर उपलब्ध असणारी ही सुविधा लवकरच अन्य ‘अँड्रॉइड’ (Android) स्मार्टफोन्सवरही उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते..

फीचर कसे काम करते..?
एखादा अपघात झाल्यास, तुमच्या ‘गुगल पिक्सेल’ स्मार्टफोनमधील ‘कार क्रॅश डिटेक्शन’ फीचरमुळे ‘ऑटोमॅटिक’ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला जातो. त्यामुळे तुम्ही संकटात असल्याचे संबंधित यंत्रणेला समजते व तुमच्यापर्यंत तातडीने मदत पोहचवण्यास मदत होते..

Advertisement

येत्या काळात ‘गुगल’ लवकरच काही नवीन सुरक्षा फीचर आणणार आहे.. त्यामुळे आगामी काळात अँड्रॉइड फोनमध्ये ‘कार क्रॅश डिटेक्शन’ फीचरसोबत ‘क्रायसिस अलर्ट’ (Crisis Alert), ‘सेफ्टी चेक’ (Safety Check) अशी फीचर्सही मिळू शकतात..

‘कार क्रॅश डिटेक्शन’ फीचरसाठी काही परवानग्या घ्याव्या लागतात.. त्यामुळे ‘पिक्सेल’व्यतिरिक्त अन्य अँड्रॉइड फोनमध्येही ही सुविधा कशी देणार, हे स्पष्ट झालेलं नाही. ‘गुगल प्ले’ (Google Play)च्या माध्यमातून व्यक्तिगत संरक्षण सुविधा दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement