SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आमदारांनी स्वतःच सांगितला किस्सा..

राजकीय घडामोडींनी चर्चेत आलेल्या आसाम, गुवाहाटीमुळे सर्वांच्याच मनात नॉर्थ ईस्ट (सेव्हन सिस्टर्स – 7 राज्ये) विषयी उत्सुकता वाढली असावी. तेथील सौंदर्यामुळे आमदार देखील खुश झाले होते. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. एकदम ओक्केमधी हाय..’ राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांचं हे वाक्य सध्या प्रचंड व्हायरल होतंय.

शिवसेनेचे (shiv sena) सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahji Bapu Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियात तुफान चर्चा होत आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल.., ओकेमध्ये हाय!’ अशी ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली.

Advertisement

गाणं होतंय व्हायरल..

अनेकांनी आता यावर गाणं (Song) बनवलं आणि काहींनी बनवायला सुरुवात केली. यू ट्यूब वर या गाण्याने अवघ्या काही तासातच लाखो व्ह्यूवर्स मिळवले आहेत. एस के ब्रदर्स यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला गायक सचिन जाधव यांनी आवाज दिला आहे. लवकरच हे गाणे लग्नातील बँड व डिजे वर एकावयास मिळेल एवढी प्रसिद्धी या गाण्याला मिळत आहे. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या मोबाईलवर हे गाणे ऐकायला मिळते तर काही बहाद्दर मंडळीने चक्क रिंगटोन ला पण हे गाणे ठेवले आहे

Advertisement

शहाजीबापू पाटलांना कसा सुचला डायलॉग..?

शहाजीबापू पाटलांनी बंडखोर आमदारांसमोर बोलताना सांगितलं की हे वाक्य नेमकं त्यांना कसं सुचलं ते आसाममधील गुवाहाटीतल्या हॉटेल रॅडीसन ब्ल्यू मध्ये या डायलॉगचा किस्सा सांगताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “साहेबांनी सांगितलं फोन स्वीच ऑफ ठेवा. तसा फोन स्वीच ऑफ ठेवला. इथं आल्यानंतर काही आमदारांना असं फोनवर बोलताना पाहिलं. तेव्हा म्हटलं, आयला आपण बी बोलू”, असं ते म्हणाले.

Advertisement

त्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आपला फोन स्वीच ऑन केला आणि हॉटेलच्या रुममध्ये असताना इतर आमदार फोनवर बोलताना पाहून त्यांनीही बोलण्यासाठी फोन स्वीच ऑन केला आणि तेव्हाच त्यांच्या सांगोल्यातील एका जवळच्या व्यक्तीचा फोन आला. पुढे ते म्हणाले, “तिकडून माझा अगदी खरा साथीदार, रफीक होता फोनवर. तो तिकडून म्हणतोय काय दोन-चार दिवस फोन नाय, काय नाय. त्यानं कुठंय, काय म्हणाल्यावर मी म्हणलं, काय डोंगार… काय झाडी… काय हाटील… एकदम ओकेमध्ये हाय सगळं रफीकभाई”, असं मी त्यांना म्हटलं. असं ऐकल्यावर इतर उपस्थित सगळ्यांनी हसून आनंद घेतला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement