SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगातील पहिला Metaverse स्मार्टफोन झाला लाँच; ‘हे’ आहेत आकर्षक फीचर्स

मुंबई :

HTC ही वर्षांपूर्वी मोबाईल जगतातील कमालीची लोकप्रिय कंपनी होती. कालांतराने मात्र HTCची लोकप्रियता कमी झाली आणि सध्या तर या कंपनीची चर्चा देखील होत नाही. मात्र आता HTC कंपनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये परत येण्यास तयार झाली आहे. HTC ने आपला नवीन फोन HTC Desire 22 Pro लॉन्च केला आहे.

Advertisement

हा फोन जगातील पहिला मेटाव्हर्स स्मार्टफोन असल्याचा दावा केला जात आहे. HTC Desire 22 Pro मध्ये क्रिप्टो आणि NFT देखील उपलब्ध आहे. हा फोन 6.6-इंचाचा डिस्प्ले आणि इतरही अनेक आकर्षक फीचर्सनेयुक्त आहे.

HTC Desire 22 Pro मध्ये 4520mAh बॅटरी आणि फास्ट चार्जेर सुविधा देण्यात आली आहे. या फोनमध्ये तीन कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे, ज्याचे अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेन्स 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे आणि तिसरी लेन्स 5 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी खास 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. HTC Desire 22 Pro मध्ये 8 GB RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेजयुक्त आहे.

Advertisement

HTC Desire 22 Pro मध्ये 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग स्पोर्टसह 4520mAh बॅटरी पॅक आहे सोबतच रिव्हर्स चार्जिंग फिचर देखील आहे. बॅटरीची क्षमता चांगली असल्याने फोन नक्कीच चांगला बॅकअप देईल असं बोललं जातं आहे. HTC Desire 22 Pro मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि वॉटर रेसिस्टंटसाठी IP67 रेटिंग देखील आहे. HTC Desire 22 Pro ची किंमत जवळपास 31,874 रुपये आहे. हा फोन दोन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये गोल्ड आणि ब्लॅक कलरचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन कधी येईल याबाबत कसलीही माहिती समोर आलेली नाही.

Advertisement