मनोरंजनाची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी पुढील महिन्यात येत्या 1 ते 8 जुलै या आठवड्यात अनेक सिनेमे, वेबसिरीज (Webseries) आणि शो आता ओटीटीवर (OTT) धमाका करण्यासाठी येणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या सिनेमा आणि वेब सीरिजचा आनंद लुटण्यासाठी, मेजवानीसाठी जाणून घ्या कधी काय होणार रिलीज..
▪️ धाकड: कंगना रणौतचा बहुचर्चित धाकड सिनेमा (Cinema) गेल्या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफीसवर या सिनेमाने काही खास जळवा दाखवला नाही. आता हा सिनेमा 1 जुलैला ZEE5 या ओटीटीवर रिलीज होत आहे. यात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही या खास भूमिका आहेत.
▪️ रणवीर वर्सेज वाइल्ड विद बिअर ग्रील्स: बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या जयेशभाई जोरदार हा सिनेमा आपटल्यानंतर लवकरच तो रणवीर बीअर ग्रील्स या शोमध्ये दिसणार आहे. 8 जुलै रोजी हा शो नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
▪️ मियाँ बीबी और मर्डर: कॉमेडी आणि क्राइमचा भरणा असलेली ‘मियाँ बीबी और मर्डर’ ही वेब सिरीज तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 जुलै रोजी मॅक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. यामध्ये टीव्ही स्टार राजीव खंडेलवाल, मंजिरी फडणीस, रूशद राणा, प्रसाद खांडेकर आणि रितिक शाह हे कलाकार आहेत.
▪️ सम्राट पृथ्वीराज: बॉलिवूड खिलाडी अक्षयकुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांचा सम्राट पृथ्वीराज सिनेमा सिनेमागृहांत रिलीज झाला तेव्हा हा सिनेमा फ्लॉप ठरला. पण आता अजूनही ज्यांना हा सिनेमा पहायचा आहे त्यांना तो 1 जुलै रोजी Amazon Prime Video वर सम्राट पृथ्वीराज पाहता येणार आहे.
▪️ स्ट्रेंजर थिंग्ज सीजन 4 वॉल्यूम 2: सध्या स्ट्रेंजर थिंग्ज सीजन 4 वॉल्यूम 2 या शोची खूप चर्चा झाली होती. हा शो 1 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
▪️ कॉफी विथ करण: करण जोहरचा कॉफी विद करण हा शो म्हणजे सेलिब्रिटी कलाकारांशी दिलखुलास गप्पा. आता तुम्हाला सातव्या सीझनचा आनंद ओटीटीवर घेता येणार आहे. 7 जुलैपासून डिज्नी प्लस हॉटस्टार वर हा शो पाहता येणार आहे.
▪️ द टर्मिनल लिस्ट: ‘द टर्मिनल लिस्ट’ ही अमेरिकन सीरीज ओटीटीवर रिलीज होणार आहे. जहाजावरील आयुष्य, कथा या सीरीजमध्ये दिसणार आहे. 1 जुलै रोजी ॲमेझॉन प्राईमवर ही सीरीज पाहता येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy