SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाच्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची निवड, 35 वर्षांनंतर घडला विक्रम..!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला एजबॅस्टन येथे आजपासून (ता. 1) सुरुवात होत आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा कोरोनाचा दुसरा रिपोर्टही ‘पाॅझिटिव्ह’ आल्याने तो या टेस्टला मुकणार आहे.. रोहितच्या गैरहजेरीत भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीमचे नेतृत्व करणार आहे..

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 35 वर्षीय बुमराह प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.. त्यामुळे त्याच्यावर गोलंदाजीबरोबरच संघाचे नेतृत्वाचीही अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. अर्थात फक्त या एकमेव सामन्यापुरतीच ही जबाबदारी असेल, असे ‘बीसीसीआय’तर्फे सांगण्यात आले.

Advertisement

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत दुसऱ्यांदाच वेगवान गोलंदाजाकडे कर्णधारपद दिलं आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून याआधी कपिल देव यांनी भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळलं होतं.. मात्र, संघातील ते एक अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे बुमराह हा पहिलाच वेगवान गोलंदाज असेल, जो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असेल.

35 वर्षांनंतर फास्ट बाॅलर झाला कॅप्टन..

Advertisement

भारताला विश्वविजेते बनवणाऱ्या कपिल देव यांनी 1987 मध्ये अखेरचे भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तब्बल 35 वर्षांनंतर वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. आतापर्यंत 35 गोलंदाज खेळाडूंनी कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व केलंय.. बुमराह हा 36वा खेळाडू ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी बुमराहला उपकर्णधार करण्यात आले होते. नंतर बुमराहने कर्णधारपद स्वीकारण्यासाठीही तयार असल्याचं म्हटलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी रोहितला कोरोनाची लागण झाली नि अखेर कर्णधार पदाची माळ बुमराहच्या गळ्यात पडली..

Advertisement

इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आधीच आघाडीवर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने ही कसोटी अनिर्णित ठेवली, तरी मालिका जिंकता येणार आहे… त्यादृष्टीने बुमराह याच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement