SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकीकडे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, दुसरीकडे ‘त्या’ बड्या नेत्याला क्लीन चिट..!

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंबाबत (Bachhu Kadu) मोठी बातमी आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Resign) यांनी काल (ता. 29 जून) बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यानंतर दुसरीकडे बच्चू कडू यांची एक फाईल बंद झाली असल्याचं समजत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज बरीचशी सत्तासंघर्ष करणाऱ्या पक्षांची राजकीय गणितं स्पष्ट होणार आहे. राज्यातील अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली असल्याची माहीती आहे. ही घडामोड उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच घडली असल्याने काही बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय.

Advertisement

वंचितने केलेल्या आरोपानुसार, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामे पालकमंत्री बच्चू कडूंनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. रस्त्यांचे ग्रामीण मार्ग क्रमांक’ नसतांना अशा कामांना प्रशासकीय मान्यता मिळू शकते का, असा सवाल वंचितनं केला होता. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले असल्याची माहीती आहे.

वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल 1 कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. पण आता या संपुर्ण प्रकरणामध्ये पुरावे आढळले नसल्याने प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांनी सांगितल्यानंतर या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.

Advertisement

वंचितचा ‘या’ रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा बच्चू कडू यांच्यावर आरोप

▪️ इजिमाला जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामामध्ये 20 लाखांच्या अपहाराचा आरोप.

Advertisement

▪️ कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत 1 कोटी 25 लाखांच्या अपहाराचा आरोप

▪️ गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामामध्ये 50 लाखांच्या अपहाराचा आरोप.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement