SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता व्हॉट्सअपवर देखील करता येणार कॉल रेकॉर्ड!

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी कॉल रेकॉर्डिंग एप्सवर सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. यामुळे स्मार्टफोन यूजर खूपच त्रस्त झाले होते. या सरकारी नियमानुसार यूजर्स नॉर्मल फोन कॉल्सला रेकॉर्ड करू शकत होते. त्यावेळी व्हॉट्सअपवरही कॉल्सला रेकॉर्ड करणे शक्य नव्हते. पण आता तुम्ही व्हॉट्सअप वर देखील कॉल रेकॉर्ड करू शकता. व्हॉट्सअपने आता आपले हे नवे फिचर अपडेट केले आहे. जाणून घेऊया याबाबत…

या पद्धतीने WhatsApp वर करा कॉल रेकॉर्ड :-

Advertisement

व्हॉट्सअपवर कॉलला रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अधिकृत पद्धत किंवा फीचर उपलब्ध नाही. या चॅटिंग प्लॅटफॉर्मवर कॉल्सला रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला (Call Recorder Cube ACR) या थर्ड पार्टी Application ची मदत घ्यावी लागेल. या Application च्या माध्यमातून तुम्ही कॉल्स सहज रेकॉर्ड करू शकता.

या Application बाबत थोडक्यात :

Advertisement

▪️ सर्वप्रथम तुम्हाला playstore वर जाऊन (Call Recorder Cube ACR) हे थर्ड पार्टी अँप डाउनलोड करावे लागेल.

▪️ मोबाईलमध्ये हे Application इंस्टॉल केल्यानंतर फोनच्या सेटिंग्स मध्ये जावून अँक्सेसेबिलिटी ऑप्शन मध्ये या Application च्या कनेक्टरला एनेबल करा.

Advertisement

▪️ आवश्यक परमिशन दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप कॉल्सच्या ऑप्शनला ऑन करावे लागेल. यानंतर सहज तुम्ही आपल्या व्हॉट्सअप कॉल्सला रेकॉर्ड करू शकता.

▪️ तसेच तुम्ही ऑटो रेकॉर्डिंग किंवा मॅन्यूअल पद्धतीने सुद्धा कॉल्सला रेकॉर्ड करू शकता.

Advertisement

टीप : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही प्रमाणात बदल असू शकतो. ही माहिती फक्त वाचकांच्या माहितीकरता देण्यात आली असून वाचकांनी याची खात्री करूनच Application डाउनलोड करावे.

Advertisement