SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आपला नावलौकिक लक्षात घेऊन वागावे. काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील. स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल. धोका पत्करू नका. मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा.

वृषभ (Taurus): इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. आज ताण तणाव वाढेल. प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. चांगली बातमी मिळण्याची शक्यता. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

मिथुन (Gemini) : भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवाल. चैनीच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा.

कर्क (Cancer) : रेस जुगारातून लाभ संभवतो. शक्यतो प्रवास टाळावा. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. धनार्जन होण्याची शक्यता. दिवसभर चिंता जाणवेल. विनाकारण धावपळ होईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम होणार आहे. काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल.

Advertisement



सिंह (Leo) : कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. उपासनेला वेळ मिळेल. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल. घरात चिंतेचे वातावरण राहील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन लागेल. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. आज मोठ्या चुका होणार नाही याची दक्षता घ्या.

कन्या (Virgo) : योग्य वेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे कमी श्रमात पार पडतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. नैराश्याला बळी पडू नका. बोलतांना इतरांचे मन दुखवू नका. रोजगार मिळण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या. मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

तुळ (Libra) : प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. स्त्री सौख्याचा लाभ होईल. आपले मत योग्य प्रकारे मांडा. चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

वृश्‍चिक (Scorpio) : तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. पत्नीशी वादाचे प्रसंग येवू शकतात. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. कोर्टाची कामे निकाली लागतील. हातातून मोठे काम होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा.

Advertisement



धनु (Sagittarius) : मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. वेळ आणि काम यांची सांगड घाला. मुलांचे वागणे स्वातंत्र्यप्रिय राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. व्यवसायात आज चांगली कमाई होईल.

मकर (Capricorn) : आवडते पदार्थ खायला मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. उत्पन्न स्थिर राहील. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा.

कुंभ (Aquarious) : दिरंगाईवर मात करावी लागेल. वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. आज कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम.

मीन (Pisces) : तुमचे श्रम वाढू शकतात. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. व्यावसायिक स्थैर्य लाभेल. प्रवासात सावधानता बाळगावी. व्यवहार करताना धोका पत्करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या जबाबदार्‍या मिळतील. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement