SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गाडीला आवडता नोंदणी क्रमांक घ्यायचा म्हणून त्याने मोजले तब्ब्ल 132 कोटी रुपये; ‘हा’ ठरला जगातला महागडा क्रमांक

मुंबई :

वाहनांचा आकर्षक नोंदणी क्रमांक हा सध्या अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. अनेकजण अंकशास्त्रावर विश्वास ठेवत असतात आणि त्यावर आधारित नोंदणी क्रमांकासाठी पैसे मोजत असतात. काही जण विशिष्ट अंक आवडतात आणि तोच पाहिजे या हट्टाने नंबरसाठी चांगलेच पैसे मोजतात. अनेकदा केवळ आपल्या आवडीचा क्रमांक घेण्यासाठी हजारो रुपयांपासून ते अगदी 30 लाखांपर्यंत खर्च केलेल्यांच्या बातम्या आतापर्यंत वाचनात किंवा ऐकण्यात आलेल्या आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष क्रमांक घेण्यासाठी लाखोंच्या बोली लिलावाच्या माध्यमातून लागतात हे सत्य आहे. युनायटेड किंग्डममधील एका व्यक्तीने त्यांच्या गाडीसाठी खास क्रमांकाची नंबर प्लेट मिळावी म्हणून तब्बल 132 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Advertisement

आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. हा f1 सिरीज अंतर्गत येणार क्रमांक आहे. युनायटेड किंग्डममध्ये एफ वन या नंबर प्लेटबद्दल वाहनमालकांना विशेष आकर्षण आहे. त्याचीच प्रचिती जगाला आता मिळाली आहे. युनायटेड किंग्डममध्ये अनेकदा ही नंबर फ्लेट महागड्या गाड्यांवर दिसून येते. विशेषतः महागड्या गाड्या ज्यामध्ये मर्सिडीज-मॅक्लरेन एसएलआर, बुगाटी व्हिरॉन यासारख्या गाड्यांचा समावेश होतो.

f1 सिरीज किंवा क्रमांक हा f1 कार रेसशी निगडित असल्याने त्याला जगभरात विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय वाहन शर्यतींमध्ये f1 हा क्रमांक 1 ला म्हणजे अव्वलस्थानी आहे. युनायटेड किंग्डममधील सर्वात लहान सिरीजमधील आणि विशेष क्रमांकांमध्ये हा क्रमांक सर्वाधिक मागणी असल्या कारणाने जगात सगळ्यात जास्त महाग म्हणून फेमस आहे. एफ वन ही नंबर प्लेट 1904 पासून अ‍ॅसेक्स शहर प्रशासनाच्या मालकीची होती आणि यानंतर 2008 साली तिचा लिलाव करण्यात आला होता.

Advertisement