SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पुष्पा-2’ मध्ये ‘या’ अभिनेत्याची एंट्री, चित्रपटात होणार तुफान राडा..

‘पुष्पा- द राईज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुन (Allu Arjun) व रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची विशेष भूमिका असलेला साऊथचा हा सिनेमा तुफान गाजत आहे. सिनेमातील गाणी आणि डायलॉग्जदेखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. RRR आणि KGF 2 चे प्रचंड यश पाहून दिग्दर्शक सुकुमार पुष्पा 2 ची स्क्रिप्टिंग आणखी वजनदार करणार असल्याचं म्हटलं जातंय, ज्यामुळे हा चित्रपट आणखी धमाकेदार होईल.

आता पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागात साऊथ स्टारची एन्ट्री होणार आहे. प्रेक्षक दुसऱ्या भागाची अर्थात ‘पुष्पा- द रूल’ची (Pushpa 2: The Rule) आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. होय, ‘पुष्पा 2’मध्ये आणखी एका धमाकेदार साऊथ स्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) ची एन्ट्री होणार आहे. रिपोर्टनुसार, पुष्पा 2’ मध्ये विजय सेतुपती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement

या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा 2’ला अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी, हिट बनवण्याच्या तयारीला लागले आहेत आणि यासाठी वेगवेगळ्या आयडिया, फंडे ते वापरण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार, विजय सेतुपती या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. त्याची भूमिका फहाद फासिलसारखी असेल की वेगळी, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. विजय सेतुपतीची चित्रपटातील एन्ट्री जवळपास निश्चित झाली आहे.

चित्रपटात पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन आणि पोलिसाच्या भूमिकेतील विजय सेतुपतिची जोरदार ॲक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. असं म्हटलं देखील जात आहे की, पुष्पाची प्रेयसी दाखवलेल्या श्रीवल्लीचा दुसऱ्या भागात मृत्यू होणार आहे. कारण अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. यावरून विजय भ्रष्ट पोलिसाच्या भूमिकेत किंवा खलनायकाच्या दिसण्याची शक्यताही जास्त व्यक्त होतेय. विजय सेतुपतीच्या एन्ट्रीची बातमी व्हायरल चाहते खूप खूश दिसत आहेत. आता जर या अभिनेत्याची एंट्री झाली तर चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं होईल, हे निश्चित आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement