SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाळ्यात सर्दीमुळे हैराण झालाय..? मग ‘हे’ उपाय करुन पाहा..!!

बदलत्या हवामानाचे परिणाम आरोग्यावरही होत असतात. पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसात नेहमी सतावणारा आजारा म्हणजे, सर्दी.. त्यामुळे चारचौघात हातात रुमाल घेऊनच उभं राहावं लागतं.. वाहत्या नाकामुळे अस्वस्थ वाटू लागतं. त्यातून खोकला किंवा घसादुखीची समस्याही उद्भवण्याची शक्यता असते..

पावसाळ्यात सर्दीचा त्रास जाणवू लागल्यास, अगदी घरगुती पद्धतीने त्यावर उपाय करता येतात.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

सर्दीवर घरगुती उपाय..

निलगिरीचं तेल
नाक वाहण्याच्या समस्येवर निलगिरीचे तेल उपायकारक असल्याचे मानले जाते.. एका संशोधनानुसार, नीलगिरी, मेन्थॉल आणि कापराचे मिश्रणामुळे श्वास घेण्याची क्षमता सुधारू शकते. त्यासाठी निलगिरी तेलात कापूर व पुदिना मिसळा. नंतर, डिफ्यूझरमध्ये तेल ठेवा आणि त्याचा सुगंध घ्या. दिवसातून दोनदा हा उपाय करावा.

Advertisement

गरम चहा
गरम पाण्यात आले, चहाची पाने व मध घालून दोन ते तीन मिनिटे उकळा.. नंतर त्याचे सेवन करा. सकाळी व संध्याकाळी या चहाचे सेवन केल्यास सर्दी गायब होऊ शकते.. सर्दी व फ्लूपासून आराम मिळविण्यासाठी गरम पेय फायदेशीर ठरू शकते.

वाफ घेणं
नाक वाहण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेऊ शकता.. टॉवेल डोक्यावर झाकून गरम पाण्याच्या भांड्यावर 5 मिनिटे चेहरा ठेवा.. फेशियल स्टीमसाठी बाजारातील ‘स्टीमर’ही वापरू शकता. दिवसातून 2 ते 4 वेळा असे केल्यास सर्दीपासून आराम मिळतो.

Advertisement

गरम पाण्यानं अंघोळ
वाहत्या नाकासाठी घरगुती उपाय म्हणजे गरम पाण्यानं अंघोळ. सर्दीची लक्षणे कमी करण्यासाठी अशी अंघोळ उपयुक्त ठरू शकते. सर्दीतून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरू शकते.

‘नेटी पॉट’चा वापर
कोमट मिठाचे पाणी ‘नेटी पॉट’ किंवा किटलीमध्ये भरुन एका नाकपुडीत ओतून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढा.. नंतर दुसऱ्या नाकपुडीने पुन्हा ही प्रक्रिया करा. दिवसातून एकदा हा उपाय करता येतो.. सर्दीवर ‘नेटी पॉट’ वापरण्याचीही शिफारस केली जाते.

Advertisement

टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.. डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement