SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जीएसटी’ परिषदेचा दणका, आता ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे…!!

वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.. चंदीगडमध्ये 47व्या ‘जीएसटी’ (GST) परिषदेच्या बैठकीला कालपासून (ता. 28) सुरुवात झाली. बैठकीच्या पहिल्याच दिवशी ‘जीएसटी’ परिषदेने अनेक वस्तूंवरील करसवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वस्तूंसाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

दर 6 महिन्यांनी ‘जीएसटी’ परिषदेची बैठक होत असते.. त्यानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीत पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.. ते खालीलप्रमाणे :

Advertisement

जीएसटी परिषदेचे निर्णय

– इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के ‘जीएसटी’ (बॅटरी लावलेली किंवा शिवाय)
– रोप-वे सेवेवर 18 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के ‘जीएसटी’
– सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्यावर 18 टक्के ‘जीएसटी’ होता. आता सूट मिळेल.

Advertisement

– पॅकबंद दही, लस्सी व बटर मिल्कवर 5 टक्के ‘जीएसटी’
– फुगलेला तांदूळ, सपाट तांदूळ, पेरच्ड राइस, पापड, मध, अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी
– न भाजलेले कॉफी बीन्स, तसेच प्रक्रिया न केलेल्या ‘ग्रीन-टी’वर 0 ते 5 टक्के ‘जीएसटी’.

– गव्हाचा व तांदळाचा कोंडा 0 ते 5 टक्के ‘जीएसटी’
– टेलरिंग व टेक्सटाईलमधील इतर जॉब वर्कवर 5 ते 12 टक्के
– पॅकबंद मासे, पनीर, फ्रोजन भाजीपाला, लोणी, गहू, आटा, गुळ, कुरमुरे, सेंद्रीय खत, कंपोस्ट खतावर आता 5 टक्के ‘जीएसटी’..

Advertisement

– प्रिंटिंग राइटिंग/ ड्रॉइंग इंकवर 5 ते 12 टक्के
– एलईडी दिवे/दिवे आणि फिक्स्चरवर 12 ते 18 टक्के सूट
– सोलर वॉटर हिटर आणि सिस्टिमवरील जीएसटी 5 वरून 12 टक्के

– तयार आणि कंपोझिशन लेदरवर 5 ते 12 टक्के
– सरकारी कामाच्या कराराच्या पुरवठ्यावरील जीएसटी 5 वरून 12 टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव
– कट आणि पॉलिश हिऱ्यावरील जीएसटी 0.25 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ

Advertisement

हॉटेलिंग महागणार

‘जीएसटी’ परिषदेच्या नव्या स्लॅबनुसार हॉटेल रूमवर 12 टक्के ‘जीएसटी’ लागू होईल.. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणंही महागणार आहे. शिवाय, ज्या रुग्णालयाच्या रुमचे भाडे 5000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यावरही 5 टक्के ‘जीएसटी’ (ITC शिवाय) आकारला जाईल.. यापूर्वी ही श्रेणी करमुक्त होती..

Advertisement

शिवाय बँकांकडून चेकवरही आता 18 टक्के ‘जीएसटी’ लागू असेल.. नकाशे व अॅटलासवर 12 टक्के ‘जीएसटी’ लागू होणार आहे. पॅकिंगव्यतिरिक्त खुले खाद्यपदार्थांवर ‘जीएसटी’ लागू नसेल, असे सांगण्यात आलं.. .

ऑनलाईन गेमिंग महागणार

Advertisement

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. 29) क्रिप्टोकरन्सीसह चर्चा झाली. राज्यांकडून आकारला जाणारा ‘व्हॅट’ तसेच 28 टक्के श्रेणीतील वस्तू व सेवांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. कॅसिनो, ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के ‘जीएसटी’ लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.. अर्थमंत्री आज सायंकाळी 5 वाजता जीएसटीच्या निर्णयांची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement