SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्रामपंचायत निवडणुकांचा ‘धुरळा’ उडणार, कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार..?

राज्याचं राजकारण तापलेले असतानाच, राज्य निवडणूक आयोगानं आज (ता. 29) मोठी घोषणा केली.. राज्यातील तब्बल 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने याबाबत एक परिपत्रक जारी केलंय.. त्यात निवडणूक आयोगानं 271 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, 5 जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान, तर 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर गावचं राजकारण रंगणार आहे..

Advertisement

राज्यात तब्बल 28,813 ग्रामपंयायती आहेत. पैकी मुदत संपलेल्या 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून (आजपासूनच) निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे..

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन प्रक्रिया राबवण्याची सूचना निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत..

Advertisement

निवडणूक कार्यक्रम

  • तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 5 जुलै 2022.
  • नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची मुदत – 12 ते 19 जुलै 2022 पर्यंत… (वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.)
  • नामनिर्देशनपत्राची छाननी – 20 जुलै 2022.
  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत – 22 जुलै 2022.
  • निवडणूक चिन्ह, अंतिम उमेदवारांची यादी – 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर).
  • मतदानाचा दिंनाक – 4 ऑगस्ट 2022.
  • मतमोजणी व निकाल – 5 ऑगस्ट 2022.

जिल्हानिहाय ग्रामपंचायतींच्या निवडणुका
– नाशिक – 40
– धुळे – 52
– जळगाव – 24

Advertisement

– अहमदनगर – 15
– पुणे-  19
– सोलापूर – 25

– सातारा – 10
– सांगली – 1
– औरंगाबाद 16
– जालना – 28

Advertisement

– बीड – 13
– लातूर -9
– उस्मानाबाद – 11
– परभणी – 3
– बुलढाणा – 5

शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्याचं राजकारण रंगलेलं असताना, आता गावच्या राजकारणातही रंग भरले जाणार आहेत. यानिमित्ताने सगळ्या पक्षांनाही आपआपली ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे… कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा काही दिवस तरी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचं दिसतं…

Advertisement

💰 आता व्हॉट्स अ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement