SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, ‘मविआ’ सरकार अखेर कोसळलं..!

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात सुरु झालेले नाट्य अखेर बुधवारी (ता. 29) संपलं.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.. परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा लगेच मान्यही केला.

गेल्या 8 दिवसांच्या राजकीय चढाओढीनंतर अखेर बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं.. आपण आता पुन्हा एकदा शिवसेना भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

Advertisement

तत्पूर्वी राज्यपालांनी 24 तासांत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या आदेशाविरुद्ध शिवसेनेने सुप्रिम कोर्टात धाव घेतली.. मात्र, सुप्रिम कोर्टानेही ठाकरे सरकारला कोणताही दिलासा मिळाला नाही व ‘फ्लोअर टेस्ट’ करण्याचा आदेश दिला होता.. अखेर ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे संवाद साधताना, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली..

मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय…

Advertisement

आपल्या भावना व्यक्त करताना, उद्धव ठाकरे म्हणाले, की “गुळाच्या ढेपेला मुंगळा चिपकून बसतो, तसा मी चिपकून बसणारा नाही. गेल्या बुधवारीच (ता. 22) ‘वर्षा’ निवासस्थान सोडून ‘मातोश्री’मध्ये आलो. आपल्या सगळ्यांसमोर आज मुख्यमंत्री पदाचाही त्याग करीत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम व आशीर्वाद दिला.”

“मी घाबरणारा नाही; पण कारण नसताना बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल.. त्या पापाचे धनी जे कुणी असतील, त्यांना होऊ द्या. मी होणार नाही, म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे व्हायचंय, ते होऊ द्या.. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या..!”

Advertisement

“एखादी चांगली गोष्ट सुरू असताना त्याला दृष्ट लागते. मला शरद पवार व सोनिया गांधी यांचे आभार मानायचे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी साधी माणसं, कुणी रिक्षावाले, टपरीवाले, तर कुणी हातभट्टीवाले… या सर्वांना माणसात आणलं.. आमदार, खासदार, मंत्री बनवलं. ज्यांना सर्व दिलं, ते नाराज झाले, ज्यांना काहीच दिलं नाही, ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत.”

शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलंत. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं.. त्यांचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि ज्यांना वाटायचेत त्यांना वाटू द्या..”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement

भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचाली

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते व नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून व पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा राजभवनात दाखल झाल्याचे समजते. कदाचित ते आजच (गुरुवारी) सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement