SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज ठाकरेंचा ‘हा’ डायलॉग धर्मवीर चित्रपटातून का कापला..?

लोकनेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा चित्रपट नुकताच काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि महाराष्ट्रभर अनेक प्रेक्षकांनी, राजकीय लोकांनी हा चित्रपट पाहिला. हा हिट चित्रपट ठरल्याने काही आठवडे चित्रपटगृहे हाऊसफुल्ल होते.

राज्यातील ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आणि लोकनेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटामधील एक व्हिडीओ शेअर करुन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत. या चित्रपटामधील एक डायलॉग काढून हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे, असं अमेय खोपकर यांचे मत आहे.

Advertisement

अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये धर्मवीर चित्रपटातील अखेरच्या सीनचे दोन व्हिडीओ दिसत आहेत.
चित्रपटगृहात रिलीज झालेल्या या चित्रपटातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंंद दिघे यांच्यातील एक सीन आणि नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या चित्रपटाचा काही सीन वेगळा (कट करून) दाखवल्याचं अमेय खोपकरांनी निदर्शनास आणलं आहे.

Advertisement

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ”धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध’ असं ट्विट केलं आहे. या चित्रपटातील एक डायलॉग एडिट केल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. ओटीटीवर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो डायलॉग काही लोकांनी चित्रपटामधून काढला आहे, ही गोष्ट प्रविण तरडे यांना सुद्धा माहित नाहीये. मी प्रविण तरडे यांना फोन केला असता त्यांनी मला सांगितलं की, या गोष्टीबद्दल त्यांना कोणतीच कल्पना नाहीये. मग दिग्दर्शकाला न विचारता डायलॉग काढला कसा? मी या गोष्टीचा निषेध करतो. मी हे लोकांसमोर आणलं आहे”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement