SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेकंड हँड मोबाईल घरबसल्या खरेदी करायचाय? ‘या’ आहेत 5 बेस्ट वेबसाईट्स..

भारतात ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या (E-Commerce Websites) माध्यमातून ऑनलाईन खरेदीचं (Online Shopping) प्रमाण वाढलं आहे. भारतात तसं 4G यायला खूप कालावधी गेला. देशातील लोक आता स्मार्टफोन्सचे बजेट नसेल तरी हप्त्यावर का होईना पण स्मार्टफोन घेत आहेत. अशात जर आपल्याला सेकंड हँड मोबाईल खरेदी करायचा असेल तर काय करावं, घ्या जाणून..

सेकंड हँड मोबाईल खरेदीसाठी वेबसाईट्स:

Advertisement

Yaantra: अनेक वेबसाईट्स आता E-Commerce क्षेत्रात उतरत आहे. आता Yaantra नावाची एक वेबसाईट देखील वापरलेले किंवा जुने मोबाईल खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी ठेवते. विविध ब्रँड्स आणि आकर्षक मॉडेल्स व फीचर्स पाहून बजेटनुसार, तुम्ही येथे सेकंड हँड फोन खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला ऑफर असल्यास डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. काही सेकंड हँड स्मार्टफोन्सवर या ठिकाणी वॉरंटी देखील असते, फक्त आपल्याला तो निवडता यायला हवा.

OLX: देशात olx ही वेबसाईट जुने आणि वापरलेले स्मार्टफोन व इतर बरंच काही ज्यावेळी सेकंड हँड वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी खूप जास्त वेबसाइट्स नव्हत्या तेव्हापासून ऑनलाईन खरेदी-विक्री करणारा मोठा प्लॅटफॉर्म आहे. खरेदी करण्यासाठी भारतात सध्या ओएलएक्स हे आता सर्वपरिचित असं नाव झालं आहे. Second Hand Smartphone खरेदी करायचा असल्यास लोक या वेबसाईटवरील इतर लोकांनी लिस्ट केलेली वस्तू पाहून त्यांना थेट संपर्क करून किंमत विचारू शकतात.

Advertisement

2Gud: जर आपण सेकंड हँड स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार केला असेल तर टूगुड एक अशी वेबसाइट्स आहे जी अनेक स्मार्टफोन्सचे पर्याय उपलब्ध करून देते. या वेबसाईट्सला फ्लिपकार्टकडून बनवण्यात आले आहे. आता या वेबपेजला फ्लिपकार्टशी जोडले आहे. ते आपण Flipkart App वर पाहिलंच असेल. जुन्या फोनची विक्रीच नव्हे तर खरेदी करण्याची सुविधा या ठिकाणी मिळते.

Amazon: ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सुद्धा Renewed Smartphone च्या मार्केटमध्ये उतरली असून यातून ग्राहकांना जुने किंवा वापरलेले (Renewed म्हणजेच नव्या मोबाईलची जशी कंडिशन असते तसे मिळणारे जुने किंवा वापरलेले मोबाईल) स्मार्टफोन्स विकत असते. आता सध्या अमेझॉनवर अँड्रॉईड स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, भविष्यात आयफोन देखील उपलब्ध होऊ शकतात. यासाठी ग्राहकांना अमेझॉनने ‘Renewed’ नावाने सेगमेंट तयार केलं आहे.

Advertisement

Cashify: Refurbished Mobile (नवीन प्रोडक्ट्समध्ये छोटे छोटे डिफेक्ट्स असतील तर ते काढून विक्रीसाठी ठेवतात) किंवा Second Hand Smartphone खरेदी करायची इच्छा असल्यास कॅशीफाय या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करू शकता. तसेच या साइट्सवर अनेकदा डिस्काउंट ऑफर्स सुद्धा ग्राहकांना मिळत असतात. या साइटवरून फोन खरेदी करण्याआधी सर्वकाही जाणून फोन खरेदी करू शकता.

(वरील लेख हा वाचकांना सामान्य माहितीसाठी पुरवण्यात आला असून वरील नमूद वेबसाईट्सवर प्रोडक्ट्स, किंमत, ऑफर आणि फसवणूक संबंधी तुम्ही खात्री करून खरेदी करावी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement