SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन? वाचा ताज्या राजकीय घडामोडी..

महाराष्ट्रात काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्तेच्या खेळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना असा सत्तासंघर्ष सुरू आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळच्या व्यक्तीने 21 जून रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला होता, अशी चर्चा रंगली असताना हा फोन सरकार वाचवण्यासाठी केला गेला होता का? अशी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या एका नेत्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अशा बातम्या समोर येत आहेत, या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये”, असं शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान म्हणाले.

Advertisement

राजकीय उलथापालथ आणि घडामोडी:

▪️ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला झाले रवाना, तर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोरांसोबत बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती – सूत्र

Advertisement

▪️ बंडखोर आमदारांना निलंबनाचा धोका आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई मागे घेतलेली नाही. 20 पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांचं म्हणणं अगदी ठाम आहे की आम्ही सभागृहात जेव्हा येऊ, तेव्हा आम्ही शिवसेनेसोबत उभे राहू – अनिल देसाई

▪️ 2-3 दिवसात राज्यात भाजपचं सरकार?: भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये गेले असता त्यांनी हे विधान केलं. महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात भाजपचे सरकार येईल, असं त्यांनी म्हटलंय. याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी यांची आषाढीची महापूजा देवेंद्र फडणवीस हे करतील, असंसुद्धा ते म्हणाले.

Advertisement

▪️राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. मुंबई केंद्रशासित करण्याचा घाट सुरू आहे. – रुपाली ठोंबरे-पाटील

▪️ शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुढील 2-3 दिवसांत राज्य सरकारने सुमारे 160 पेक्षा जास्त शासन निर्णय काढले असता आता त्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सोमवारी (27 जून) नोटीस पाठवली असून त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिल्याचं समजतंय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement