SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महिलांसाठी आनंदाची बातमी..! नेव्हीमध्ये मुलींना मिळणार ‘या’ पदावर नोकरीची संधी..!!

भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘अग्निपथ’ ही योजना जाहीर केली.. या योजनेनुसार केल्या सैन्य भरतीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे महिलांसाठी सैन्य दलातील नोकरीची खास संधी उपलब्ध झाली आहे..

नौदलात महिला अधिकारी आधीच सेवा देत असल्या, तरी खालच्या पदावर कोणीही नाही. आता ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नेव्हीमध्ये (नौदल) प्रथमच ‘खलाशी’ (Navy Female Sailors) म्हणून मुलींची भरती केली जाणार आहे.. ‘खलाशी’ पदावरील भरतीबाबत संरक्षण मंत्रालयाने ओडिसाच्या ‘आयएनएस चिल्का’ (INS Chilka) या नौदल प्रशिक्षण संचालनालयाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘आयएनएस चिल्का’कडून या भरतीबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे.

Advertisement

‘अग्निपथ’ योजनेतून रिक्त पदावर भरती झालेल्या उमेदवारांना ‘आयएनएस चिल्का’ इथेच प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका बॅचमध्ये ‘नेव्ही फिमेल सेलर्स’ची (महिला खलाशांची) नियुक्ती केली जाईल. त्यात पद व पदाचे नावही दिलं असून, फेब्रुवारी-2023 मध्ये पहिली तुकडी येणार आहे. त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत… या भरतीतील पुरुष-महिला अग्निवीरांच्या प्रशिक्षणासाठीचे मापदंड बदललेले नाहीत.

या पदांसाठी भरती

Advertisement
  • एव्हिएशन नॉन टेक्निक
  • एव्हिएशन टेक्निक
  • लॉजिस्टिक
  • संगीतकार
  • वैद्यकीय

नौदलातील अग्निवीर भरती

  • ‘नौदल अग्निवीर बॅच-2022’साठी तपशीलवार अधिसूचना 9 जुलै रोजी जारी केली जाईल.
  • पहिल्या बॅचसाठी अर्जाची विंडो 15 ते 30 जुलैपर्यंत खुली असेल.
  • नौदलातील अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता.
  • ‘आयएनएस’, ओडिसा येथे वैद्यकीय चाचणी व प्रवेश 21 नोव्हेंबरला होईल.

वायुसेनेतही भरती सुरु
अग्निपथ योजनेअंतर्ग भारतीय वायुसेनेने (IAF) देखील भरतीची अधिसूचना जारी केलीय. त्यानुसार एअरफोर्समध्ये भरतीसाठीची नोंदणी सुरु झाली असून, 5 जुलैपर्यंत मुदत आहे. दहावी पास ते डिप्लोमा धारक किंवा व्यावसायिक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर सुरू आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement