SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयकर रिटर्न भरण्यासाठी उरले शेवटचे काही दिवस

आयकर भरण्यासाठी शेवटचा काही दिवस राहिले आहेत. प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2022 हीच असून, यात बदल करण्याचा सध्यातरी कोणतीही विचार नसल्याचे अर्थ मंत्रालयातर्फे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

या वर्षी फायलिंग पद्धतीमध्ये खूप बदल झाले आहे. त्यामुळे आयकर विभाग करदात्यांना आता काळजीपूर्वक कर फायलिंग करावे लागणार आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आरटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक खात्याची माहिती आणि अन्य उत्पन्नाचा पुरावा असणे गरजेचे आहे. आरटीआर फाइल दाखल करण्यासाठी पॅन कार्ड हे आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा ईमेल आयडी देखील आयकर विभागाजवळ नोंदणीकृत असला आहे.

Advertisement

टॅक्स भरताना कोणती काळजी घ्याल?

टॅक्सची अचूक माहिती द्या

Advertisement

आयटी रिटर्न्स भरताना टॅक्सची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. यातून अॅडव्हान्स टॅक्स, टीडीएसची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कमी टॅक्स भरला तर आयटी रिटर्न्समध्ये टॅक्स भरण्याची संधी मिळेल. तसंच जास्त टॅक्स जमा झाला असेल तर रिफंड मागितला जाऊ शकतो.

वर्ष आणि फॉरमॅट तपासून घ्या

Advertisement

आयटी रिटर्न्स भरताना मूल्यनिर्धारण वर्ष आणि त्याचा फॉरमॅट नीट तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या टॅक्सपेअर्ससाठी फॉरमॅटही वेगळा असतो. तसंच प्रत्येक वर्षी हा फॉरमॅट बदललाही जातो. म्हणूनच तुमचा फॉरमॅट नीट तपासून घेणं गरजेचं आहे.

मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा

Advertisement

तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.

मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा

Advertisement

तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.

अचूक बँक डिटेल्स

Advertisement

आयटी रिटर्न्स भरताना अचूक बँक डेटल्स पुरवणं हेदेखील फार महत्वाचं आहे. चुकीची बँक डिटेल्स दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही सर्व काळजी घेतली तर तुम्हाला आयटी रिटर्न्स भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं सोपं होईल.

Advertisement