SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हा’ भन्नाट व्यवसाय सुरु करा.. महिन्यात लखपती व्हाल…!!

अनेकांना नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी लागते थोडेसे धाडस.. नि अर्थातच भांडवल..! स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यात जोखीम असली, तरी त्यात जम बसल्यास होणारी कमाईही मोठी असते.. शिवाय तुमच्यामुळे इतर चार लोकांच्या हातांनाही काम मिळू शकते..

सध्या असे अनेक व्यवसाय आहेत, जे कमी भांडवलातही सुरु करता येतात. तुमचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.. चला तर मग एका आगळ्या-वेगळ्या व्यवसायाबाबत (Bussiness plans) जाणून घेऊ या..!

Advertisement

‘काॅर्न फ्लेक्स’ व्यवसायाबाबत…
सकाळच्या नाष्ट्याला खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे, ‘काॅर्न फ्लेक्स’..! बहुतेक घरांमध्ये ‘काॅर्न फ्लेक्स’ (corn flex) दिसतातच.. त्यामुळे ‘काॅर्न फ्लेक्स’च्या व्यवसायातून तुम्ही महिन्यात लखपती होऊ शकता.. महत्वाचं म्हणजे, हा ‘काॅर्न फ्लेक्स’ तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही घेण्याची गरज नाही..

आवश्यक गोष्टी
‘काॅर्न फ्लेक्स’चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मशिन्स, वीज, ‘जीएसटी’ क्रमांक, कच्चा माल, जागा व साठा ठेवण्यासाठी गोदामाची गरज लागेल.. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किमान 2 ते 3 हजार चौरस फूट जमीन असायला हवी, जेथे हा प्रकल्प उभारता येईल. तसेच साठवणूक करता येईल…

Advertisement

किती गुंतवणूक करायची..?
‘काॅर्न फ्लेक्स’ व्यवसायासाठी सुरुवातीला किमान 5 ते 8 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. मोदी सरकारतर्फे ‘मुद्रा’ कर्ज योजना चालवली जाते.. ज्या अंतर्गत सरकार स्टार्ट-अप उद्योगपतींना 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. तुम्हाला सुरुवातीला फक्त 50 हजार रुपये गुंतवावे लागतील, बाकीचे पैसे कर्ज स्वरूपात मिळतील.

कमाई किती होईल..?
साधारणपणे एक किलो ‘कॉर्न फ्लेक्स’ बनवण्यासाठी सुमारे 30 रुपये खर्च येतो. बाजारात 70 रुपये किलो दराने तुम्ही ते सहज विकू शकता. रोज 100 किलो ‘कॉर्न फ्लेक्स’ विकल्यास तुम्हाला रोजचा नफा 4000 रुपये होईल. या हिशेबाने तुम्ही दर महिन्याला 1,20,000 रुपये कमाई करु शकता. व्यवसाय वाढेल, तसा कमाईतही भर पडेल..

Advertisement

विशेष म्हणजे, या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या मशिनद्वारे मक्याचेच नव्हे, तर गहू व तांदळाचेही ‘फ्लेक्स’ बनवता येतात.. त्यामुळे तुमच्या नफ्यात आणखी भर पडू शकते..!!

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement