‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक किंवा तत्सम परीक्षेत उमेदवारांची शारीरिक क्षमतेचीही चाचणी केली जाते.. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक उमेदवारांनी खोटी शारीरिक माहिती दिल्याचे समोर आले आहे..
उमेदवारांकडून एकप्रकारे ‘एमपीएससी’ची फसवणूक केली जात होती. अखेर ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, यापुढील काळात कोणत्याही उमेदवाराने शारीरिक चाचणीसाठी खोटी माहिती दिल्यास, त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा ‘एमपीएससी’ने दिला आहे..
लोकसेवा आयोगाची फसवणूक
लोकसेवा आयोगाने सोमवारी (ता. 27) सकाळी ट्विट करुन उमेदवारांना यासंदर्भातील माहिती दिली.. शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापनाचा तपशील अर्जात नमूद करताना अचूक भरणे आवश्यक आहे. चुकीची शारीरिक मोजमापे अर्जात नमूद केल्याचे आढळून आल्यास, ती लोकसेवा आयोगाची फसवणूक समजण्यात येईल…
शारीरिक मोजमापे/ अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाकरिता मोजमापणांचा तपशील अर्जामध्ये नमूद करताना अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची मोजमापे नमूद केल्यास आयोगाची फसवणूक समजण्यात येईल.
Advertisement— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 27, 2022
उमेदवार खोटी शारीरिक माहिती देत असल्याने, आयोगाचा वेळ वाया जातो. परीक्षेच्या कारभाराचा ताणही वाढतो. अनेकदा उमेदवारांसोबत वादावादीचेही प्रकार घडतात. उमेदवारांकडून खोटी माहिती देऊन आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आल्याचे महाराष्ट्र राज्य एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक आणि तत्सम परीक्षेत असे प्रकार होत असल्याचे दिसते.. उमेदवारांकडून उंची किंवा छातीबाबतची मोजमापे खोटी दिली जातात. अशी माहिती देणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. ‘एमपीएससी’मार्फत लवकरच याबाबत ‘नोटिफिकेशन’ जारी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले..