SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदीही महागली; ‘या’ कारणामुळे बाजारात तेजी..!!

अमेरिकेसह सात देशांचा समूह असलेल्या G7 देशांनी रविवारी (ता. 26) रशियाकडून केल्या जाणाऱ्या सोन्याच्या आयातीवर बंदी घातली. G7 शिखर परिषदेच्या (G7 Summit) सुरुवातीलाच ही घोषणा करण्यात आली. या निर्णयाचे परिणाम भारतीय सराफ बाजारावर आज (ता. 27) पाहायला मिळाले..

सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झालीय (Gold-Silver Price). ‘इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाइटनुसार, सोन्याचा आजचा दर 51,021 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 50,829 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याच्या दरात 192 रुपयांची वाढ झालीय.

Advertisement

अर्थात, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर सार्वकालिन उच्चांकावर पोहोचला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅम अशा विक्रमी पातळीवर होता. त्या तुलनेत आजही सोने 5,179 रुपये प्रति तोळा स्वस्त असल्याचे दिसते..

Advertisement

प्रमुख शहरातील सोन्याचे दर (प्रति तोळा)

चेन्नई

Advertisement
  • 22 कॅरेट – 47,700 रुपये
  • 24 कॅरेट – 52,030 रुपये

कोलकाता

  • 22 कॅरेट – 47,650 रुपये
  • 24 कॅरेट – 51,908 रुपये

मुंबई

Advertisement
  • 22 कॅरेट – 47,650 रुपये
  • 24 कॅरेट – 51,980 रुपये

दिल्ली

  • 22 कॅरेट – 47,650 रुपये
  • 24 कॅरेट – 51,980 रुपये

चांदीलाही झळाळी
सोन्याप्रमाणेच चांदीलाही आज चांगलीच झळाळी मिळाली. चांदीचा दर (Silver Price) आज 60,507 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 59,350 प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे चांदीच्या दरात किलोमागे तब्बल 1157 रुपयांची वाढ झाल्याचे दिसतेय.

Advertisement

रशियावर घातलेल्या निर्बंधामुळे जागतिक बाजारातही सोने-चांदीच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. त्यामुळे जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,835.57 डॉलर प्रति औंस होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.21 टक्के जास्त आहे.

अमेरिकेत चांदीची स्पॉट किंमत 21.39 डॉलर प्रति औंसवर असून, मागील बंद किंमतीपेक्षा ती 1.17 टक्के जास्त आहे. इतर मौल्यवान धातूंमध्ये, प्लॅटिनमची स्पॉट किंमत 0.5 टक्क्यांनी वाढून 912 डॉलर प्रति औंस झाली, तर पॅलेडियमची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढून 1,886.65 डॉलरवर पोहोचली.

Advertisement

दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाकडून सोन्याच्या आयातीवर निर्बंध घातले असले, तरी फार काळ त्याचा फारसा परिणाम होणार नाही, परंतु काही काळ तरी जागतिक बाजारावर, तसेच देशांतर्गत सराफा बाजारावरही हे परिणाम दिसू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement