SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकनाथ शिंदे गट मनसेमध्ये जाणार? वाचा आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी..

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आता देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे ट्विटरवर ट्रेंडिंगला आहे. शिवसेनेचे उदय सामंत गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याने शिवसेनेत आता अजून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे येथे झालेल्या तोडफोडीला बीड येथे शिवसैनिकाची बोलेरो गाडी फोडून संताप व्यक्त केला गेला.

आता सध्याच्या घडीला आसाममधील गुवाहाटीतील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’हॉटेलने 30 जूनपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्व बुकींग बंद केल्याचं समजतंय. म्हणजेच राजकीय उलथापालथ पाहता या हॉटेलमधील रूम्स 30 जूनपर्यंत इतर लोकांसाठी उपलब्ध असणार नाही. यासोबतच काही दिवसांपासून मनसेची शांत भूमिका आता चर्चा उठवणारी ठरू शकते, कारण समाजमाध्यमांमधून एकनाथ शिंदे-मनसे सत्ता स्थापित करू शकतात, असं वारं घुमू लागलं आहे.

Advertisement

एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदें यांनी फोन केला होता. यावेळी दोन वेळा या नेत्यांमध्ये काल फोन कॉल झाला यामुळे राजकीय चर्चा देखील झाल्याचं समजतंय.

कायदेतज्ज्ञांच्या मते, जर दोन तृतीयांश आमदार एकत्र आले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात एंट्री केली तर त्यांची आमदारकी आहे तशी राहते. यामुळे जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनी जर मनसेमध्ये प्रवेश केला तर अनेक उद्देश सध्या होतील. जसे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढविण्यात मोठा वाटा उचलला होता आणि त्यांच्या या कष्टाचं चीज होईल. बाळासाहेब ठाकरे यांना ते आपलं दैवत मानतात तर मनसे देखील आपल्या पक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करतात आणि विचारांना मानणारा पक्ष असल्याने पुढील एकाच दिशेला हे आमदार जाऊ शकतात.

Advertisement

याउलट पाहिलं तर भाजपा पूर्ण विरुद्ध आहे. हिंदुत्वावरून भाजप आणि शिवसेनेत खटके उडत असले तरी बाळासाहेब ठाकरे यांना मानायला तर सर्व मानतात पण त्यांच्या विचारांना जपणारा आणि त्यावरून राजकारण करणारा भाजप नाहीये, कारण देशात मोठ्या असणाऱ्या पक्षांपैकी एक भाजपचं स्वतः असं एक वेगळं अस्तित्व आहे.

सत्तासंघर्षाच्या खेळामध्ये आता पुढे काय..?

Advertisement

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात न्यायालयीन संघर्ष पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थिरतेबाबत तिढा अजूनही वाढत आहे. शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदासाठीच्या नियुक्तीला एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आह़े या दोन याचिकांवर आज (ता. 27 जून) सकाळी साडेदहा वाजता सुनावणी आहे.

आज काय होणार..?

Advertisement

एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची दहा वाजता बोलावली बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता.

आदित्य ठाकरे यांचा संध्याकाळी 5 वाजता कर्जत येथे कार्यकर्त्यांचा मेळावा, रात्री 8 वाजता भायखळ्यातील ताडवाडी शाखेला भेट, रात्री 08:45 वाजता माहीमच्या दादर शाखेला भेट.

Advertisement

एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता या सुनावणीस सुरवात होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement