SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी महामंडळाचा मोठा आर्थिक निर्णय

पुणे : कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील 1 हजार गाड्या सीएनजीमध्ये (cng)रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 16 हजार बस आहेत. यात फक्त 50 बस सीएनजीच्या असून त्या ठाणे विभागात आहेत. तर पुणे ते अहमदनगर मार्गावर दोन बस या विजेवर धावणाऱ्या आहेत. आणखी 148 विजेवरील बस लवकरच ताफ्यात येतील. भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे. इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी सीएनजीबरोबरच इतर पर्यायांचाही वापर करण्याचे निर्देश मंत्री परब यांनी दिले आहेत.

हेही वाचा : https://thegadiwala.in/2022/06/23/indias-first-ev-car-battery-burn-accident-in-mumbai/

दरम्यान, सध्या डिझेलवर धावणाऱ्या 1 हजार गाड्यांचे सीएनजी या पर्यायी इंधनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देणार आहे. सीएनजीमुळे इंधनाचा खर्च कमी होऊन प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यास एसटी महामंडळाचा नक्कीच हातभार लागेल असे सांगण्यात आले आहे.

Advertisement