SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराट कोहलीचा इंग्लंडमध्ये तुफान राडा, ‘या’ युवा बाॅलरसाठी थेट चाहत्याशी भिडला..!!

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून भारतीय संघ व खेळाडू सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहेत. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली याने तेथे भारतीय चाहत्यांबरोबर तुफान राडा घातल्याचे समोर येत आहे..

आपल्या आक्रमक स्वभावासाठी विराट कोहली ओळखला जातो.. मैदानावर अनेकांनी त्याचे हे रुप पाहिले आहे.. मात्र, मैदानाबाहेर तसा तो शांत असतो.. मग, असं नेमकं काय झालं, की विराट थेट चाहत्यांनाच भिडला..? याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..?

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ‘लिसेस्टरशायर क्लब’ विरुद्ध सराव सामना झाला.. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा प्रसंग घडला. सराव सामन्यादरम्यानच विराट कोहली व प्रेक्षकांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

भारताचा युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी नेट बाॅलर म्हणून संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तो कसोटी संघाचा सदस्य नाही.. एका चाहत्याने फोटोसाठी कमलेश नागरकोटी याच्यासोबत असभ्य वर्तवणूक केली. भारतीय चाहत्यांचे हे वागणं विराटला काही आवडलं नाही व त्यातूनच विराट व चाहत्यामध्ये ‘तू तू मैं मैं’ झाली.

Advertisement

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यात चाहता असं म्हणतोय, की “हा सामना पाहण्यासाठी मी ऑफिसमधून खास सुट्टी घेतलीय.. मला नागरकोटी याच्यासोबत एक फोटो काढायचा होता..” त्यावर कोहली म्हणाला, ‘तो (नागरकोटी) इथं मॅच खेळायला आलाय, फोटो काढायला नाही..”

दरम्यान, त्यानंतर या दोघांमध्ये जोरदार वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.. आपल्या युवा गोलंदाजासाठी विराट कोहलीने चाहत्याला अंगावर घेताना, चांगलेच खडे बोल सुनावल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement