SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामे घ्यावीत. आज पैशांत वाढ होईल. मैत्रीचे संबंध अधिक चांगले होतील. जुगाराची आवड जोपासली जाईल. अधिकाराची जाणीव ठेवून वागा. वास्तवाचे भान राखा. आत्मनिर्भर व्हा. कोणाकडूनही अपेक्षा बाळगू नये. वाद टाळा. कामाचा ताण राहील. सप्ताहाची सुरुवात थोडी कटकटीची असेल. नोकरीत वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा.

वृषभ (Taurus): जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. वैचारिक दर्जा सुधारता येईल. मानसिक चांचल्य जाणवेल. महत्त्वाचे करार आणि व्यवहार आज टाळणे हिताचे. कायदा-नियम पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे. वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दूरचे प्रवास करावे लागतील.

मिथुन (Gemini) : घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. धावपळ दगदग टाळा. तब्येत जपा. काहींना स्थान बदलाला सामोरे जावे लागेल. चिंतेचे विचार मनात येतील. हितचिंतक व्यक्तीशी मन मोकळे करा. रागावर नियंत्रण ठेवा.

कर्क (Cancer) : फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल. सेवेचे महत्व लक्षात घ्यावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. अघळपघळ गप्पा मारल्या जातील. भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. वास्तवाचे भान राखा. वाद टाळा आणि कायदा-नियम पाळा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील.

Advertisementसिंह (Leo) : योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधी चालून येवू शकते. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देवू नका. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. घरच्यांना वेळ द्याल. जवळच्यांची मदत कराल. हुशारीने प्रश्न सोडवाल. आर्थिक नियोजन हिताचे. अनुकूल घटना घडतील. अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घेऊ नका.

कन्या (Virgo) : उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील. कमिशन मधून मिळणार्‍या लाभाचा फायदा घ्या. वरिष्ठांची नाराजी दूर करावी. अती अपेक्षा ठेवू नका. आर्थिक नियोजन, वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे लाभाचे. कामात मन लागेल. उत्साह राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काहींना उच्च अधिकार प्राप्त होतील. सरकारी कामात यश मिळेल.

तुळ (Libra) : जुन्या कामातून लाभ होईल. कमी श्रमात कामे केले जातील. जुगार खेळताना सावध रहा. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. हाता पायाला किरकोळ इजा संभवते. अती घाई संकटाकडे नेई. प्रेमात सावध राहा. व्यवहाराचे भान राखा. वाद टाळणे आणि हुशारीने वागणे फायद्याचे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. संयमाने बोलणे आवश्यक आहे. तडकाफडकी निर्णय घेणे टाळा.

वृश्‍चिक (Scorpio) : उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. झोपेची तक्रार दूर होईल. घरातील वातावरणात प्रसन्नता राहील. आवडी-निवडी बाबत ठाम राहाल. नियोजन करणे लाभाचे. पाठपुरावा करा. यश मिळेल. दिवस चांगला जाईल. जवळचे प्रवास करावे लागतील. मनासारखी धनप्राप्ती होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात बरकत राहील. हातात पैसा खुळखुळता राहील.

Advertisementधनु (Sagittarius) : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. शांत व संयमी विचार करा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. काटकसरीवर भर द्यावा लागेल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. लाभाचा दिवस. आर्थिक नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगतीसाठी प्रसंगी संयम महत्त्वाचा. नियोजनाने यश मिळेल. दगदग करू नका. संमिश्र ग्रहमान राहील. सुरुवातीला खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. दगदग होईल अशी कामे करू नका.

मकर (Capricorn) : योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. तुमच्या हातून दान धर्म केला जाईल. चोरांपासून सावध रहा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. मनाला आवरा. क्षमता ओळखून नियोजन करा. तब्येत जपा. व्यवहाराला महत्त्व द्या. वास्तवाचे भान राखा. आराम करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. आपला नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. जीवनासाथी आपल्याला सांभाळून घेईल.

कुंभ (Aquarious) : कामात वडि‍लांची मदत होईल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. नसते धाडस अंगाशी येवू शकते. कामातील चिकाटी सोडू नये. आर्थिक व्यवहार जपून करावेत. चांगली संधी मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. तरुण वर्गाला व्यवसायात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे व्यवहार जुळून येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात कटकटी निर्माण होतील.

मीन (Pisces) : मनातील भलते-सलते विचार बाजूला सारावेत. आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल. मन:शांती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. उष्णतेचा त्रास जाणवेल. प्रगतीचा योग. इतरांवर प्रभाव टाकाल. आत्मविश्वासाने काम कराल. आर्थिक नियोजन हिताचे. संयमाने वागणे आवश्यक. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना भेटवस्तू मिळतील. नोकरीत तणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. तब्येतीकडे लक्ष द्या. वाहने जपून चालवा.

Advertisement