SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ 5 शानदार बाईक लवकरच भारतात होणार लॉन्च

तुम्हीसुद्धा बाईक प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, भारतीय बाजारात 5 शानदार बाईक्स लवकरच लॉन्च होणार आहेत. कोरोना महामारीनंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग हळू-हळू गती मिळवत आहे आणि बाईक्सची बाजारपेठही दिवसेंदिवस मोठी होत आहे. अशातच आता ऑगस्टपर्यंत भारतीय बाजारपेठेत पाच उत्तम बाईक्सची एंट्री होणार आहे.

Bajaj Pulsar 250 Eclipse : नवीन Bajaj Pulsar चा फर्स्ट लुक समोर आला आहे. त्याचे नाव ‘Eclipse Edition’ असे दिले जाऊ शकते. नवीन बजाज पल्सर N250 ची ब्लॅक एडिशन त्याच्या सध्याच्या मॉडेलवर आधारित असेल अशी अपेक्षा आहे. हे मॉडेल पुढील महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकते.

Advertisement

Kawasaki (Kawasaki Versys 650) : कंपनी अपडेटेड 2022 Versys 650 लवकरच भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या महिन्याच्या अखेरीस ती भारतीय बाजारात येऊ शकते.

Royal Enfield Hunter 350 : Royal Enfield Hunter 350 भारतीय बाजारपेठेत ऑगस्टच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. हे 350 आणि क्लासिक 350 प्रमाणेच 349cc, एअर/ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनसह येईल. यात 5-स्पीड गिअरबॉक्स असेल.

Advertisement

BMW G310 बाजारात येणार : BMW Motorrad जुलैमध्ये भारतात नवीन 310cc स्पोर्ट्स बाईक लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेल TVS Apache RR310 चे रिबॅज असू शकते अशी अपेक्षा आहे. दोघांमध्ये थोडाफार फरक असण्याची शक्यता आहे.

TVS Zeppelin : TVS कंपनी (TVS) आपली नवीन बाईक 6 जुलै रोजी लॉन्च करण्याची योजना आखत आहे. ऑटो एक्सपो 2018 मध्ये शोकेस केलेली Zeppelin संकल्पना आवृत्ती बाजारात लॉन्च केली जाईल, अशी अपेक्षा आहे. TVS Zeppelin ही ब्रँडच्या लाईनअपमधील पहिली क्रूझर असेल.

Advertisement