मुंबई :
भारतात सप्टेंबर महिन्यात 5G नेटवर्क लाँच होईल असं बोललं जात आहे. मात्र वापरकर्त्यांना काही प्रश्न एका सर्व्हे अंतर्गत विचारल्यास ते सांगतात की, 5G आल्यास नक्कीच आनंद आहे मात्र इथं 4G चं नेटवर्कला स्पीड कमी आहे, तर 5G चं काय घेऊन बसायचं.
Jio, Airtel आणि Vi या कंपन्या भारतात 5G लाँच करणार आहेत. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा जगात 118वा नंबर लागतो. हा आकडा Ookla ने यावर्षी जाहीर केला आहे. भारतात इंटरनेट स्पीड कमी असण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यामध्ये पाहिलं कारण म्हणजे देशाची वाढणारी लोकसंख्या.
जेवढे लोक वाढत आहेत, तेव्हढेच मोबाइल यूजर्सची संख्या देखील वाढत आहे. भारतात मोबाईल युझर्सची संख्या जास्त आणि स्वस्त डेटा प्लॅनमुळे कंपन्यांना त्रुटींमध्ये सुधारणा करण्यास अडचण निर्माण होत आहे. भारतात डेटा पॅक हा इतर देशांच्या तुलनेत खूप कमी किंमतीमध्ये मिळतो. स्वस्त डेटा असल्याच्या कारणाने देशभरात कानाकोपऱ्यात 4G चं नेटवर्क गेलं. मात्र स्वस्त असल्यामुळे त्याची क्वालिटी देखील कमी दर्जाची आहे असं मोबाईल कंपन्यांचं म्हणणं आहे.
दुसरी गोष्ट आहे इंफ्रास्ट्रक्चर. भारतीय मोबाइल यूजर्सची मोठी संख्या व स्वस्त डेटा प्लान्समुळे भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोट्यात जावे लागले आहे. Reliance Jio आणि Airtel या कंपन्यांनी देखील ARPU वाढणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
ARPU चा अर्थ सांगायचं झाल्यास एक मोबाइल यूजर सर्विससाठी सरासरी किती रुपये खर्च करतो. आता कंपन्यांनी देखील इंफ्रास्ट्रक्चरवर चांगले काम केले, सुधारणा केल्यास निश्चितच आपल्याला चांगल्या क्वालिटीचं नेटवर्क मिळू शकतं.