SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराटनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूला कोरोना, टीम इंडियाच्या अडचणीत भर…

भारत व इंग्लंडमध्ये येत्या 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना होणार आहे. मात्र, त्याआधीच ‘टीम इंडिया’साठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.. आधी आर. अश्विन, नंतर विराट कोहली व आता टीम इंडियाच्या कॅप्टन रोहित शर्मा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे..

रोहित शर्मा याची शनिवारी (ता. 25) ‘रॅपिड अँटीजेन’ चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा सध्या ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. ‘बीबीसीसीआय’ने (BCCI) याबाबत ट्विट करीत माहिती दिली..

Advertisement

आज पुन्हा कोरोना चाचणी

‘भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये तो ‘आयसोलेशन’मध्ये आहे. आज (रविवारी) पुन्हा एकदा त्याची ‘आरटी-पीसीआर’ टेस्ट केली जाईल..’ असं ‘बीबीसीसीआय’ने ट्विटमध्ये म्हटलं आहे..

Advertisement

रोहित शर्माचा ‘आरटी-पीसीआर’ चाचणीचा अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आल्यास, भारतीय संघाच्या अडचणीत मोठी भर पडणार आहे. कसोटी सामना तोंडावर (1 जुलै) आलेला असताना, रोहित या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. कोरोनातून सावरण्यासाठी त्याला किमान एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ‘लिसेस्टरशायर’ विरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळला गेला. त्यात रोहित शर्मा संघाचा भाग होता. पहिल्या डावात त्याने फलंदाजीही केली, मात्र दुसऱ्या डावात त्याला फलंदाजी करता आला नाही. दुसऱ्या डावात रोहित ऐवजी के.एस. भरत याला सलामीला पाठवले होते..

इंग्लड दौऱ्यासाठी टीम इंडिया 16 जूनला रवाना झाली. मात्र, त्याआधीच ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तो टीमसोबत इंग्लंडला गेला नव्हता. त्यानंतर लंडनला पोहोचताच विराट कोहली यालाही कोरोनाची लागण झाली होती. आता हे दोन्ही खेळाडू बरे झाले असले, तरी रोहितमुळे संघाच्या अडचणी कायम आहेत.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement