SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाची बातमी, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जाहीर..

गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाला अखेर राज्यात सुरुवात झालीय. महाराष्ट्रात माॅन्सून (Monsoon) पोहोचण्यास उशीर झाला असला, तरी आता ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाला सुरुवात झाल्याने रखडलेल्या खरिपाची पेरण्यांना आता वेग येण्याची चिन्हे आहेत.

पावसाला सुरुवात झाली असली, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाने जोर धरलेला नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते..

Advertisement

गेल्या 24 तासांपासून कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यांसह ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्गातील मालवण येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कळवण येथे 70 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. शिवाय नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतही तुरळक पाऊस झाला.

मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, जालना जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. विदर्भातही हलक्या सरी कोसळ्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. या पावसामुळे पेरण्या सुरु होणार असल्या, तरी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस व्हायला हवा, असे सांगण्यात आले.

Advertisement

येलो अलर्ट

  • मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे.
  • मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली.
  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली.
भारतीय हवामान विभागाने कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी ‘यलो अलर्ट’ देण्यात आलाय. विदर्भात चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येते..
Advertisement