SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मायक्रोसॉफ्टचा युझर्सना मोठा झटका

मुंबई :

मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जवळपास सर्वच देशांमधील लॅपटॉप आणि पीसीवर वापरली जाते. गेल्या वर्षी कंपनीनं आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम windows 11 सादर केली होती. ही सिस्टीम आल्यानंतर मात्र आता मायक्रोसॉफ्टने आपली एक जुनी ऑपरेटिंग सिस्टम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

मायक्रोसॉफ्ट आता windows 8.1 बंद करत आहे. नवीन लाँच केलेल्या windows 11 आणि windows 10चा युजरकर्ते कमालीचा वापर करत असल्यामुळे मायक्रोसॉफ्टनं हा निर्णय घेतला आहे.

मायक्रोसॉफ्टनं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 पासून विंडोज 8.1 वर अपडेट आणि फीचर्ससाठी आपलं काम बंद करणार आहे. सध्या जे कोणी हे ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहेत, अशांना पुढच्या महिन्यात कंपनीकडून अलर्ट पाठवण्यात येईल.

Advertisement

कंपनीनं आपल्या एका अपडेटमध्ये म्हटलं आहे की, विंडोज 8 चा सपोर्ट 12 जानेवारी 2016ला बंद करण्यात आला होता आणि विंडोज 8.1चा सपोर्ट 10 जानेवारी 2023 ला बंद करण्यात येणार आहे. 10 जानेवारी या तारखेनंतर मायक्रोसॉफ्ट 365 ऍप्स विंडोज 8 किंवा 8.1 वर वापरता येणार नाही असं देखील कंपनीनं म्हटलं आहे.

विंडोज 8 किंवा 8.1वापरणारे असे कित्येक लॅपटॉप आहेत ज्यामध्ये windows 11 ला सपोर्ट करू शकत आणि त्यामध्ये चालणार नाही. त्यासाठी कंपनीनं युजरकर्त्यांना windows 10 विकत घेण्याचा आणि फुल व्हर्जन इन्स्टॉल करून आपले पीसी आणि लॅपटॉप अपग्रेड करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्ही देखील विंडोज 8 किंवा 8.1 वापरत असाल तर तुम्हाला लवकरच नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करावी लागेल आणि अपग्रेड व्हावं लागेल.

Advertisement