SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चावडीही झाली ‘हायटेक’, शेतकऱ्यांना मिळणार ‘ही’ खास सुविधा…!!

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता महसूल व कृषी विभागही हायटेक होत आहेत. महसूल विभागाने आतापर्यंत ‘ई-पीक पाहणी’, ‘ऑनलाईन सातबारा उतारा’ असे उपक्रम सुरु केल्यानंतर आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे..

शेतकऱ्यांना जमिनीसह, अकृष जमिनींचा महसूल (कर) घरबसल्या भरता यावा, यासाठी महसूल विभागातर्फे राज्यात ‘ई-चावडी’ (E-Chawadi) उपक्रम राबवला जाणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतीकर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी कर घरबसल्या भरता येणार आहेत.

Advertisement

‘एनआयसी’च्या मदतीने भूमि अभिलेख विभागाने हा उपक्रम राबवण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली आहे. या ‘ई-पोर्टल’चे काम आता अंतिम टप्प्यात असून, येत्या 1 ऑगस्टपासून राज्यात त्याची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी एका गावात हा प्रयोग राबवला जाणार आहे.

शेतसारा वसुलीचे काम हायटेक
गाव नमुना क्रमांक 17 प्रमाणे तलाठी गावातील शेतसारा वसुल करीत असतात. मात्र, आता हे काम हायटेक होणार आहे.. त्यासाठी तलाठ्यांना समजेल असे सॉफ्टवेअर बनविले जात आहे. ‘ई-चावडी’अंतर्गत यामध्ये नोंदी केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे नियमित शेतसारा भरला जाईल व कारभारातही तत्परता येईल, असा विश्वास राज्य सरकारला आहे.

Advertisement

शेतसारा भरुन घेण्यासाठी तलाठीच मध्यस्ती असतील. तलाठ्यांकडून खातेदाराला सर्वप्रथम नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर ‘ई-चावडी’ पोर्टलवरही नोटीस दिसेल. त्यावर क्लिक करुन शेतकऱ्यांना रक्कम अदा करता येईल.. भरलेल्या रकमेची पावतीही लगेच मिळेल.. जमा झालेला हा शेतसारा तलाठी महसूल प्रशासनाकडे जमा करतील.

कराबाबतची सारी माहिती
या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती, थकीत कर किती, तसेच जमिनींचा अनधिकृत वापर तर होत नाही ना, याची माहिती मिळणार आहे. त्यासाठीचा दंडसुद्धा ऑनलाइन पद्धतीने भरता येणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

बिनशेती झालेल्या जमिनींवर उभ्या रहिलेल्या सोसायट्यांनाही दरवर्षी ‘एनए’ टॅक्स भरावा लागतो, परंतु अनेक सोसायट्यांना त्यांची माहितीच नाही.. हा कर कुठे, कसा भरावयाचा, याचीही सोसायटीधारकांना माहिती नसते. त्यातून थकबाकी वाढून जप्तीही होऊ शकते.. मात्र, ‘ई-चावडी’ पोर्टलवर हा करही भरता येणार असल्याचे सांगण्यात आले.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement