SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार एकरकमी 1.5 लाख रुपये, थकीत ‘डीए’बाबत महत्वाची बातमी..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढीचा फरक म्हणजे ‘एरियर’ गेल्या 18 महिन्यांपासून थकित आहे.

जून-2020 ते जून-2021 या कालावधीतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मिळालेला नाही. हे कर्मचारी सातत्याने या थकित महागाई भत्त्याची मागणी करीत आहेत. त्याची दखल घेत, केंद्र सरकारने अखेर या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.. या कर्मचाऱ्यांना एकरकमी 1.5 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

केंद्र सरकारचे तब्बल 47.68 लाख कर्मचारी व 68.62 लाख पेन्शनर्सना या निर्णयाचा लाभ होणार आहे. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम’ने यासंदर्भातील मागणी केंद्र सरकारसमोर ठेवली आहे. अर्थात, अद्याप त्यावर निर्णय झालेला नसला, तरी मोदी सरकार लवकरच यासंदर्भात निर्णय घेईल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.

अर्थ मंत्रालयाच्या ‘पर्सनल ट्रेनिंग’ विभाग व वित्तीय व्यवहार विभागाची नुकतीच बैठक झाली. त्यात कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी एकरकमी देण्यावर चर्चा झाली. सरकारकडून कर्मचाऱ्यांना लवकरच एकरकमी 1.5 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्राकंडून समजली..

Advertisement

‘लेव्हल-1’च्या कर्मचाऱ्यांची थकीत डीए एरियर 11,880 रुपये ते 37,000 रुपये, तर ‘लेव्हल-13’ कर्मचाऱ्यांची थकबाकी 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयांदरम्यान असेल, असे सांगण्यात येते.. पैकी 1.5 लाख रुपये एकरकमी दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे..

‘डीए’ पुन्हा 5 टक्क्यांनी वाढणार..

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली होती. त्यामुळे डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्क्यांवर गेला आहे. जुलैमध्ये ‘डीए’मध्ये 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण डीए 39 टक्क्यांपर्यंत पोचू शकतो.. केंद्र सरकार महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या काळात ही वाढ केली जाते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement