घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला होम लोनची गरज पडतच असते. होम लोनची घेण्याची प्रोसेस ही साधारणतः किचकट असते. मात्र घर घेताना होम लोन घेणं पुरुषांपेक्षा महिलांसाठी सोपं आहे. CRIFF हायमार्कच्या अहवालानुसार, महिला कर्जदारांमध्ये डीफॉल्ट दर 0.63 टक्के इतका आहे.
पुरुष कर्जदारांच्या तुलनेत 15 बेसिस पॉइंटने महिला कर्जदारांचा डीफॉल्ट दर कमी करण्यात आला आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला कर्जदारांवर बँका अधिक विश्वास ठेवतात असं काही सर्व्हेंदरम्यान समोर आलेलं आहे. महिलांना गृहकर्ज घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था उत्कृष्ट पॅकेजेस, कमी प्रक्रिया शुल्क आणि इतरही अनेक प्रकारच्या सवलती देत आहेत.
सरकारने आणलेल्या उपक्रमांमुळे परवडणाऱ्या घरासांठी गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या लाभांमध्ये वाढ झाली आहे.पंतप्रधान आवास योजना सुरु झाल्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत मागच्या काही काळापासून 6% वाढ झाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मालमत्तेचे सह-मालक असणे आवश्यक आहे आणि त्यांना 2.67 लाख रुपयांचे व्याज अनुदान स्वरूपात मिळते. कर्जामध्ये महिलांचा समावेश केल्याने कर्ज घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुलभ आणि जलद होते.
खरेदीदाराने भरलेल्या प्रत्येक मालमत्तेच्या व्यवहारावर सरकार एक विशिष्ट असा मुद्रांक शुल्क आकारात असते. आकारण्यात येणार्या शुल्काची रक्कम घराच्या खरेदी किमतीच्या टक्केवारीवर आधारित असते आणि बहुतेक लोक ते कर्जाचा एक भाग मानतात कारण बँका ही रक्कम देखील देतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना मुद्रांक शुल्कावर 1-2% सूट मिळते, ज्यामुळे त्यांच्यासाठी कर्ज घेणं हे स्वस्त ठरतं .