SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): घरगुती कामे वाढतील. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. खळाळता उत्साह मावळू देऊ नका. अती कामामुळे थकवा जाणवेल. कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल. नोकरी कार्यात यश मिळेल. यश साजरा करण्याची संधी मिळेल. व्यापार्‍यात यश आणि प्रवास करण्याची वेळ येईल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा.

वृषभ (Taurus): मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रलोभनाला भुलून जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. दुसर्‍यांच्या कामात हस्तक्षेप करू नका, मन प्रसन्न राहील. कोर्ट कचेरीचे काम सत्कारणी लागेल. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

मिथुन (Gemini) : वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. बोलतांना विचारपूर्वक बोलावे. उत्पन्नात घट होण्याची शक्यता, धावपळ होईल, यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

कर्क (Cancer) : वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. कलात्मक दृष्टीकोन ठेवून वागाल. गप्पा मारण्याची हौस पूर्ण कराल. इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रीत करा. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम, व्यापारात यश मिळेल. संयम बाळगा, वेळ वाया घालवू नका. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Advertisement


सिंह (Leo) : घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. प्रवास करण्याचा योग येईल, जवळची व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता. धोका पत्करू नका. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कन्या (Virgo) : तुमचा आवेग योग्य ठिकाणीच दाखवा. काही ठिकाणी नरमाईचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका. कौटुंबिक कामे आनंदाने कराल. व्यवसायात यश मिळेल, कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

तुळ (Libra) : जोडीदाराची मते जाणून घ्या. वडिलोपार्जित कामे लाभदायक ठरतील. बाहेर गावी जाण्याचे बेत आखाल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत. चिंता आणि ताण असेल, अविवाहित असाल तर लग्नाचा योग जुळू शकतो. नोकरीत प्रगती होईल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा.

वृश्‍चिक (Scorpio) : नवीन लोकांशी मैत्री वाढेल. तरुण वर्गाच्या जास्त संपर्कात याल. आधुनिक विचारांची देवाणघेवाण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. राग लोभावर नियंत्रण ठेवा, अतिरिक्त खर्च होतील, धोका पत्करू नका, वाद वाढू शकतात. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

Advertisement


धनु (Sagittarius) : पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील. नियोजनबद्ध कामे सुरळीत पार पडतील. प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील. शेअर मार्केटमधून आर्थिक लाभ होईल. बेरोजगारी दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा.

मकर (Capricorn) : तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी. खेळाडूंनी अधिक कसरत करावी. महत्वाकांक्षेच्या जोरावर धाडस करतांना सावधानता बाळगा. अचानक धनलाभ संभवतो. नवीन योजना सुरू होईल. जुना आजार बळावण्याची शक्यता. प्रभाव कार्यात यश मिळेल. मोठी समस्या उद्भवू शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. स्थावरची कामे अचानक सामोरी येऊ शकतात.

कुंभ (Aquarious) : स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जाईल. मनातील अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल. घराबाहेर सहकार्य मिळेल, बक्षीस किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. मोठी समस्या दूर होईल. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : पूर्व नियोजित कामात यश येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नको तिथे आपले मत मांडू नका. नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता. घाई करू नका. लांबलेली कामे मार्गी लागतील. आयुष्याच्या जोडीदाराची साथ लाभेल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement