मुंबई :
ॲमेझॉन शॉपिंग हा प्लॅटफॉर्म जगात सर्वात जास्त लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲमेझॉन आपल्या इतर काही प्रॉडक्ट्सवर देखील काम करताना दिसत आहे. ॲमेझॉनचे ॲलेक्सा हे प्रॉडक्ट कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. आता या ॲलेक्सामध्ये काही नवीन फीचर्स आले आहेत, जे नक्कीच सगळ्यांना आवडतील असे आहेत. आता तुमच्या आवाजाचे अनुकरण करताना ॲलेक्सा दिसणार आहे. नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणून ॲलेक्सा लोकप्रिय आहे. ॲमेझॉन ॲलेक्सामध्ये बदल करणार असून ॲलेक्सा जिवंत किंवा मृत कोणाच्याही आवाजाची नक्कल करु शकणार आहे.
ॲमेझॉनने रि:मार्स या परिषदेत याबद्दल घोषणा केली आहे. आठवणींना उजाळा देण्यासाठी ॲमेझॉनने घेतलेल्या कार्यक्रमात ॲमेझॉन नवीन फिचर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीने याबद्दल स्पष्टीकरण दिले असून,येत्या काळात ॲलेक्सा कोणत्याही व्यक्तीचा आवाज सुमारे एक मिनिटे ऐकल्यानंतर त्या आवाजाची नक्कल करत त्या आवाजात बोलू शकेल असं देखील कंपनीने म्हटलं आहे.
या संदर्भात ॲमेझॉनने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलं ॲलेक्साला त्याच्या आजीच्या आवाजात गोष्ट वाचण्यासाठी सांगतो आहे. यानंतर लगेच ॲलेक्सा त्या मुलाच्या आजीच्या आवाजाची नक्कल करतो. ॲलेक्साला कोणत्याही आवाजाची नक्कल करता यावी यासाठी कंपनीनं नवीन प्रणाली विकसित करण्यासाठी कंपनीने योजना आखली आहे.
हे फीचर आल्यानंतर ॲलेक्सा कोणत्याही आवाजाची नक्कल करु शकेल. या फीचरचा वापर करून आपण आपल्या जिवलग व्यक्तीचा आवाज ऐकू शकतो. यामुळे आपल्याला त्याच्या आठवणींचा उजाळा करणे सोपे जाईल.