SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता रविवारी देखील बँकेचे काम होणार, आलीय एसबीआयची भन्नाट सुविधा..

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांसाठी बँकेने मोठी खुशखबर आणली आहे. आता बँकेची सतत व्यस्त असणारी टोल फ्री सेवा आता आणखी सोईस्कर झाली आहे. कारण बँकेने आपल्याकडून नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बँकेच्या ग्राहकांना आता या सुविधांचा घरबसल्या फायदा घेता घेणार आहे. ग्राहकांना आता अनेक कामं एका फोनवरून करता येणार आहेत.

एसबीआयने जारी केला टोल फ्री नंबर: ग्राहकांच्या सुविधेसाठी एसबीआयनं दोन टोल-फ्री नंबर जारी केले आहेत. या दोन टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन ग्राहक घरबसल्या बँकेशी संबंधित जवळपास पाच महत्वाची कामं अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. याने बँकिंग सुविधा अधिक जलद गतीने होऊ शकणार आहेत.

Advertisement

एवढंच नाही तर तुम्हाला रविवारच्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा बँकेच्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही तुमचं रखडलेलं काम एका फोनवरुन करु शकणार आहात. एसबीआय बँकेनं टोल-फ्री नंबर जारी केल्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल तर साध्या मोबाईलवरूनसुद्धा एसबीआय बँकेच्या ग्राहकांना व्यवहार करता येणार आहेत. एसबीआयनं ट्विट करत 18001234 आणि 18002100 हे दोन टोल-फ्री नंबर जारी केले आहेत.

कोणकोणती कामं होणार?

Advertisement

एसबीआयच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला की, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती मिळणार आहे.

ग्राहक या क्रमांकांवर कॉल करून त्यांचे कार्ड ब्लॉक किंवा नवीन कार्ड स्थिती जाणून घेऊ शकतात.

Advertisement

तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर चेकच्या डिस्पॅच स्थितीबद्दल देखील माहिती मिळवू शकता.

वरील दोन टोल फ्री क्रमांकांद्वारे, ग्राहक टीडीएस कपातीविषयी माहिती मिळवू शकतात व ई-मेलद्वारे व्याज प्रमाणपत्र सादर करू शकतात.

Advertisement

महत्वाचं म्हणजे जुने एटीएम ब्लॉक केल्यानंतर ग्राहक नवीन एटीएमसाठी अर्ज करू शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement