SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इलेक्ट्रिक स्कुटर्सबाबत मोठी बातमी

मुंबई :

इलेक्ट्रिक गाड्यांचं युग सुरु झालं आहे असं म्हणायला आता हरकत नाही. सध्या कित्येक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. मात्र मागील काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. ओला, टाटा नेक्सन आणि इतरही कंपन्यांच्या गाड्या जळल्याच्या कित्येक घटना समोर आलेल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांबाबत आता केंद्र सरकारने या गाड्या निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA)ने ओला इलेक्ट्रिकला नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सीसीपीएने ओला कंपनीला 15 दिवसांची मुदत दिली आहे. ओला कंपनीला 15 जून रोजी ही नोटीस देण्यात आली आहे. अर ईव्ही आणि बूट मोटर्स या कंपन्यांना देखील याआधी अशाच प्रकारच्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.

देश का पहला मामला; Tata की ‘इस’ मशहूर EV कार में लगी आग

Advertisement

CCPA ने Ola इलेक्ट्रिकला स्कूटरमधील आगीच्या घटनेमागील कारण आणि दर्जाबाबत प्रश्न केले आहेत. एप्रिल महिन्यात स्कुटरला आग लागल्याच्या घटनेननंतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या 1441 युनिट्स परत मागवण्यात आल्या होत्या. बॅटरी सिस्टम AIS 156 मानदंडांचे पालन करते असं कंपनीने यावेळी स्पष्टीकरण दिलं होतं.

Advertisement

ज्या स्कूटर्स परत मागवल्या जात आहेत, त्यांची आमच्या सेवा अभियंत्यांद्वारे तपासणी केली जाईल आणि बॅटरी सिस्टम, थर्मल सिस्टम तसेच सुरक्षा प्रणालीची कसून तपासणी केली जाईल असं देखील कंपनीने स्पष्टीकरण दिलं होतं. या नोटिसी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर दिल्या गेलेल्या आहेत. वाहन उत्पादकांना कडक संदेश देताना गडकरी म्हणाले की, ते अशा प्रकरणांची तज्ञ समितीमार्फत चौकशी करतील आणि वाहन कंपन्यांना मोठा दंड आकारण्याचे निर्देश जारी करतील.

Advertisement