SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ पाच अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तुम्हाला आहे धोका; तात्काळ करा डिलीट 

मुंबई :
हे तंत्रज्ञानाचं पर्व आहे असं कित्येक जण म्हणत असतात. मुलांच्या शाळेपासून तर ऑफिस कामापर्यंत सगळंच आता ऑनलाईन शक्य झालं आहे. व्यवहार, मनोरंजन आणि जवळपास सगळ्याच गोष्टी आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. असं असताना ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही अनेक समोर आलेले आहेत किंबहुना ते वाढले आहेत. काही अँपमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर आपला डेटा चोरी झाल्याच्या कित्येक घटना सध्या घडताना दिसत आहेत. अशातच आता असे काही अ‍ॅप्स समोर आले आहेत जे तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तुमचाही डेटा चोरला जाऊ शकतो.
PIP Pic Camera Photo Editor हे अँप इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. पाईप पीक कॅमेरा फोटो एडीटींग हे मालवेअर फेसबुक लॉगिन तपशील चोरत असल्याची माहिती समोर आलेली आहे. दुसरं अ‍ॅपआहे Wild & Exotic Animal Wallpaper. हे अ‍ॅप मास्करेडिंग नावाचे अॅडवेअर आहे. या अँपमुळे आपल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या अ‍ॅप्सची आयकॉन आणि नाव बदलले जात आहे. यातूनच खऱ्या समस्यांचा उगम होताना दिसत आहे. तिसरं अँप आहे Zodi Horoscope – Fortune Finder. या अँपद्वारे स्मार्टफोनमध्ये हॅक करणारे मालवेअर फेसबुक खात्याचे तपशील चोरले जात आहेत.
PIP कॅमेरा 2022 हे अ‍ॅप चौथ अ‍ॅप आहे जे तुम्हाला तात्काळ डिलीट करावं लागणार आहे. या अ‍ॅपद्वारे  सायबर गुन्हेगार फेसबुकद्वारे आपली माहिती चोरतात. Magnifier Flashlight हे पाचवं अ‍ॅप आहे जे आपला डेटा चोरत आहे. या अ‍ॅपचा वापर करून सायबर गुन्हेगार फसवणूकासाठी त्यांच्या फोनवर अॅडवेअर पाठवतात आणि त्यांच्याकडून डेटा गोळा करतात. त्यामुळे आपल्याही फोनमध्ये हे अ‍ॅप असतील ते तर तात्काळ डीलीट करा. अन्यथा आपला अत्यंत महत्वाचा वैयिक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो.