SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुण्यातील कंपनीची Electric वाहन क्षेत्रात धमाकेदार एंट्री; ‘ही’ बाईक केली लाँच

पुणे :

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आगामी काळात भारतात 80 टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असणार असं देखील सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत विशेष आकर्षण ग्राहकांकडून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे दुचाकी इलेक्ट्रिक वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. अशातच आता अजून एक मोठी बातमी थेट महाराष्ट्रातून समोर आली आहे.

Advertisement

पुण्यातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक ईव्हीट्रीक मोटर्सने आता यामध्ये उडी घेली आहे. बुधवारी त्यांनी आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक ईव्हीट्रीक राइज लाँच केली आहे आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांच्या रेसमध्ये आपली एंट्री केली आहे. Evtric Rise ही एक हाय-स्पीड बाईक आहे. ही बाईक स्टाइलिंग आणि हाय-एंड तंत्रज्ञानासह येते. EVTRIC मोटर्सच्या टीमने हे उत्पादन 1,59,990 रुपयांच्या (एक्स-शोरूम इंडिया) सीकर राजस्थान येथे एका डीलर्स मीटिंग दरम्यान लॉन्च केले.

Evtric Rise इलेक्ट्रिक बाईकला 3.0 KWH लिथियम-आयन डिटेचेबल बॅटरी आहे. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तासांचा कालावधी लागतो. बाईक वापरकर्त्यांसाठी ऑटो कट फीचर असलेल्या 10amp मायक्रो चार्जरने बॅटरी चार्ज करणे सुरक्षित आणि सोईचे आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 110 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.

Advertisement

या इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 70 kmph आहे. Evtric राइजला शार्प कट्ससह स्पोर्टी लुक, डे रनिंग लाइट फंक्शनसह एलईडी, खास रियर विंकर्स फीचर्स मिळतात. बाईक सध्या आकर्षक लाल आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. Evtric राइज 70v/40ah लिथियम-आयन बॅटरीसह जोडलेल्या 2000W BLDC मोटरद्वारे समर्थित आहे. ही बाईक रोजच्या वापरासाठी अत्यंत चांगली आहे.

Advertisement