SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

MPSC ची मोठी घोषणा; 800 पदांसाठी होणार भरती

मुंबई :

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अधिकारी पदासाठी महाराष्ट्रात भरती सुरु होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Subordinate Services Prelims Exam 2022) इथं लवकरच काही जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

Advertisement

सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. यासाठी शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

एकूण 800 जागा या भरती प्रक्रियेत असणार आहेत. वरील तीनही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. यासोबतच अर्जदारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक अशी अट आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं अनिवार्य आहे.

Advertisement

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रं उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत. आमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी भरती शुल्क 394 रुपये इतकं असणार आहे. मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी भरती शुल्क हे 294 रुपये असणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

Advertisement