एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच राजकिय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 42 आमदारांना आसामला घेऊन गेले आहे. अजूनही काही संपर्कात आहे.
आमदार हॉटेलमध्ये, खर्च किती..?
गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहणाऱ्या एकनाथ शिंदेंसह इतर आमदार यांच्यावर लाखोंची उधळण चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदारांचा पाठिंबा असून त्यात 40 पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत. तर, इतर अपक्ष आमदार आहेत, आम्ही बहुमताची संख्या पार केली आहे. तांत्रिक, कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. आज या आमदारांची महत्वाची बैठक होणार असून पुढील रणनीती काय असेल, यावरून बैठकीनुसार पुढील काही निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.
प्राप्त माहीतीनुसार, आता या हॉटेलमध्ये आता जवजवळ 42 आमदार आहेत. शिवसेनेमधून बंडखोरी करणारे आमदार आधी गुजरातला सुरतमध्ये एका शानदार हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांना चार्टर्ड प्लेनने गुवाहाटी येथे पाठवण्यात आले.
आसामच्या रॅडिसन ब्लू हाॅटेलमधील तब्बल 70 खोल्या या बूक केल्याचं असल्याचं समजतंय. रॅडिसन ब्लू हॉटेलमधील एका खोलीचे भाडे 6800 रुपयांपासून सुरू होते. डिलक्स रूमचे भाडे 8000 पर्यंत आहे. अशा स्थितीत नक्कीच अंदाजा येईल की, राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात किती पैसा खर्च होत आहे.
इतकेच नाही तर तब्बल 56 लाख रुपये 7 दिवसांसाठी या हाॅटेलचे भाडे होणार आहे तर रॅडिसन हॉटेलच्या आसपास सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा खर्च भाजपाने केला असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. असे म्हटले जात आहे की, हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक केलेल्या 70 खोल्यांव्यतिरिक्त, कॉर्पोरेट डीलवर आधीच बुक केलेल्या खोल्या सोडता व्यवस्थापन नवीन बुकिंग घेत नाहीत, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy