महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून. आता शिंदे गट 35 हुन अधिक आमदारांना घेऊन गुवाहटी येथे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असायचे बोलले जात आहे. अशातच आता बीड येथील एका शेतकऱ्याने अनोखी मागणी राज्यपाल महोदयांकडे केली आहे. राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.
सदर शेतकऱ्याने बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे पत्र राज्यपालांना दिले आहे. श्रीकांत विष्णू गदळे असं शेतकऱ्याचे नाव आहे.
पत्रात नेमके काय?
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
दरम्यान, राज्याचे राज्यपाल माझ्या पत्राची दखल घेऊन मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वासही गदळे यांनी व्यक्त केलाय.