SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वेला लटकून प्रवास करताना हात सटकला, आणि पुढे जे झालं…

एका एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी व्यक्तीने मोबाईलमध्ये एक धक्कादायक घटना शूट केली आहे. त्यात एका लोकल ट्रेनच्या मोटर कोचला एक तरुण लटकून प्रवास करताना दिसला आहे. अचानक या 18 वर्षे वय असणाऱ्या तरुणाचा हात सटकला आणि तो लगेच खाली पडला. बघता बघता जमाव जमला आणि त्वरित त्याला कळव्यामधील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या जखमी तरुणाचा जीव वाचला आहे. दानिश नामक हा तरुण कळव्यामध्ये राहण्यास आहे. तो 23 जूनला सकाळी साडेनऊ वाजता कळवा ते दादर असा प्रवास लोकलच्या मोटरकोच डब्यास लटकून करत होता, हे अनेकांनी पाहिलं. हा प्रवास या तरुणाचा एकट्याचाच नव्हता तर त्याच्यासोबत आणखी दोन प्रवासीही लटकून प्रवास करत होतो. प्रवास करताना प्रवासादरम्यान दानिशचा हात सटकला आणि तो रुळाच्या बाजूला पडला आणि गंभीर जखमी झाला.

Advertisement

प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेने मात्र प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती ही सर्व घटना बाजूनेच जाणाऱ्या एका एक्सप्रेसमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केली. या घटनेत दोन अनोळखी इसमांनी घटनास्थळी धाव घेऊन दानिशला त्वरित रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. हा अपघात स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे जखमी प्रवाशाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यामुळे प्रवाशांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्राप्त माहीतीनुसार, लोहमार्ग पोलिसांच्या नोंदीनुसार लोकलमधून पडून किंवा रेल्वे रुळाच्या आसपासच्या खांबाला धडकून जखमी किंवा मृत्यू असे अपघात झालेल्यांची वाढ झाली आहे. 2020 मध्ये लोकलमधून पडून 177 जणांचा, तर रुळाच्या जवळचा खांब लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 2021 मध्ये 277 जणांचा मृत्यू आणि रुळाजवळील खांबाला आदळून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहीती आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement