SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरातील सिलिंडरचा होऊ शकतो स्फोट? सिलिंडरवरच असते ‘ही’ माहीती..

देशातील लाखो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाकघरात गॅस सिलिंडर वापरतात. पण या सिलिंडरची एक्सपायरी डेटही आपल्याला माहीत असते. आपल्या स्वतःच्या, घरातील सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला सिलिंडरविषयी आवश्यक ती माहिती असावी लागते. आपण वापरत असलेलं सिलिंडर किती वर्षे टिकू शकतं किंवा किती सुरक्षित आहे, जीवाला धोका तर नाही ना अशी माहीती घेणं गरजेचं असतं.

सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOC) दिलेल्या माहीतीनुसार, सर्व एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) बनवताना विशेष काळजी घेत एका विशेष प्रकारचे स्टील आणि संरक्षक कोटिंगसह बनवले जातात आणि सिलिंडरचे उत्पादन हे BIS 3196 अंतर्गत आहे.

Advertisement

मिळालेल्या माहीतीनुसार, फक्त अशाच सिलिंडर उत्पादकांना ते तयार करण्याची परवानगी असते, ज्यांना मुख्य स्फोटक नियंत्रकाची (CCOE) मंजुरी मिळाली आहे आणि त्यांच्याकडे BIS परवानादेखील आहे. तसं पाहिलं तर हे परिपत्रक 2007 या वर्षीचे आहे, पण इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीच्या आधारे ज्या वस्तू विशिष्ट वेळी नाश पावणार आहेत, अशा वस्तूंची एक्सपायरी तारीख आहे.

एलपीजी सिलिंडरबद्दल सांगायचं झालं तर, सिलिंडरचे उत्पादन अनेक बाह्य व अंतर्गत मानकांनुसार बाजारात आणले जाते, त्यामुळे त्यांची एक्सपायरी तारीख नसते तर त्यांची फक्त वेळेवर चाचणी केली जाते. त्यावरून ते वापरायचे की नाही ठरवले जाते. म्हणून एलपीजी सिलिंडरची वैधानिक चाचणी व पेंटिंगसाठी ठराविक वेळ ठरवण्यात आलेला असतो. तसेच त्यावर कोडप्रमाणे लिहिले जाते की, पुढील तारखेला ते चाचणीसाठी पाठवले जातील.

Advertisement

सिलिंडर चाचणीसाठी कधी पाठवतात?

उदाहरणार्थ, समजा सिलिंडरवर A 2022 असं लिहिलं असेल तर 2022 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) ते चाचणीसाठी पाठवून दिले जातात. याचप्रमाणे ज्या सिलिंडरवर B 2022 लिहिलेले असते ते 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून), C 2022 म्हणजे 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर), D 2022 म्हणजे 2022 च्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) सिलिंडर पुन्हा चाचणीसाठी पाठवले जातात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement