SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी योजना : आता दरमहा 210 गुंतवणूक करा आणि मिळवा 5000 पर्यंत मासिक पेन्शन

प्रत्येकालाच भविष्याची चिंता असते. त्यातही निवृत्तीनंतरचे आयुष्य तणावमुक्त आणि आर्थिक स्थैर्याचे असावे असे प्रत्येकाला वाटते. जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात स्थैर्य अपेक्षित असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. लोकांच्या गरजा समजून घेऊन सरकार अनेक योजना राबवते, जिथे तुम्ही गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. तुम्हाला तुमची सेवानिवृत्ती सुरक्षित करायची असेल, तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करू शकता.

अटल पेन्शन योजनेचे फायदे :

Advertisement

एखाद्या व्यक्तीला मिळणारे पेन्शन ही त्याने केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. गुंतवणुकदाराला या योजनेअंतर्गत रु. 1,000 किंवा रु. 2,000 किंवा रु. 3,000 किंवा रु. 4,000 किंवा कमाल रु. 5,000 मिळतील. जर एखाद्याला 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळवायचे असेल तर त्याला वयाच्या 18 व्या वर्षापासून दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.

एवढेच नाही तर दर 6 महिन्यांनी 1239 रुपयांची गुंतवणूक करून 60 वर्षानंतर प्रति महिना 5000 रुपये आजीवन पेन्शन मिळेल. याची सरकार कडून गॅरेंटी देखील मिळेल. त्याचबरोबर जर पती-पत्नी दोघांनीही गुंतवणूक केली तर वर्षाला 1.2 लाख रुपये पेन्शन मिळेल.

Advertisement

या योजनेत 10,000 रुपये मासिक पेन्शन देखील मिळते?

जर एखाद्या विवाहित जोडप्याला दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर ते या योजनेअंतर्गत स्वतंत्रपणे त्यांचे खाते उघडू शकतात. असे केल्याने त्यांना वयाच्या 60 व्या वर्षांनंतर दरमहा 10 हजार रुपयांचे पेन्शन मिळेल. जर पती-पत्नीचे वय 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर त्यांना त्यांच्या अटल पेन्शन योजना खात्यात दरमहा 577 रुपये जमा करावे लागतात.

Advertisement

योजनेतील गुंतवणूकवर किती फायदा
▪️ दरमहा 3000 रुपयांचे निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी 18 ते39 वर्षे वयोगटातील व्यक्तीला दरमहा 126 ते 792 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून 5.1 लाख रुपयांची रक्कम जमा होईल.

▪️ तर दरमहा 4000 रुपयांचे निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी 18 ते 39 वर्षे वयोगटातील व्यक्तीला दरमहा 168 ते 1054 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून 6.8 लाख रुपयांची रक्कम जमा होईल.

Advertisement

▪️ तर दरमहा 5000 रुपयांचे निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी 18 ते 39 वर्षे वयोगटातील व्यक्तीला दरमहा 210 ते 1318 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून 8.5 लाख रुपयांची रक्कम जमा होईल.

टीप : वरील योजनेच्या नियमात काही बदल असू शकतो. वाचकांच्या माहितीकरिता ही माहिती देण्यात आली असून या बातमी मध्ये काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी खात्री करून घ्यावी. व त्यानंतरच अर्ज करावा.

Advertisement