SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आवक जावक यांचा मेळ जुळवावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामात काही अनपेक्षित बदल संभवतात. घरगुती प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे. मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. लाभदायी करार होतील. कौटुंबिक आनंद असेल.

वृषभ (Taurus): कामाची एकाच धांदल उडेल. योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा. कमिशन मधून चांगला लाभ मिळेल. इतरांचा विश्वास संपादन करावा. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. नवी दिशा देण्यात यश मिळेल. वाहन खरेदी करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आरोग्य चांगले राहील. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून विचारांना खाद्य पुरवा.

Advertisement

मिथुन (Gemini) : कामात आळस आड आणू देऊ नका. जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. हाताखालील लोकांवर बारीक लक्ष ठेवावे. कुणावरही चटकन विश्वास टाकू नका. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. नवीन ओळखी संभवतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. मानसिक शांति मिळेल. वेळ सत्कारणी लागेल.

कर्क (Cancer) : तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. गरज नसेल तर प्रवास करू नये. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्यात दिवस खेळीमेळीत जाईल. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. लाभाच्या संधी. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही.

Advertisement

सिंह (Leo) : केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन मित्र जोडाल. खूप दिवसांनी जुने मित्र भेटतील. पत्नीशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. अपचनाचा त्रास जाणवेल. वेळेच महत्व समजा.’ आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील.

कन्या (Virgo) : जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. आजचा दिवस हसत-खेळत घालवाल.

Advertisement

तुळ (Libra) : सामुदायिक वादापासून दूर राहावे. स्त्री वर्गापासून हानी संभवते. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. उत्तम गृह सौख्य लाभेल. मित्रांबाबतचे गैर समज दूर होतील. पैसा मिळू शकतो. कौटुंबिक नात्यातील अंतर मिटवण्यासाठी प्रयत्न करणे चांगले. घरातील नवीन कामाच्या योजनेसाठी तुम्ही स्वतःला समर्पित कराल. यश वाढेल. आज मूड चांगला असेल.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तु खरेदी कराल. मानाच्या व्यक्तींची गाठ पडेल. प्रकृतीबाबत हयगय करू नका. उष्णतेचे त्रास संभवतात. नोकरीतील प्रलंबित कामांवर विजय मिळवण्याचा आजचा दिवस आहे. व्यवसायात कोणत्याही वादात पडू नका. आरोग्याबाबत सावध राहा. तुमचे विनयशील वागण्या-बद्दल कौतुक होईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : मनातील चुकीचे विचार दूर सारावेत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी सलोखा वाढवावा. खर्चाचे प्रमाण आटोपते ठेवावे. जोडीदाराशी सल्ला मसलत करावी. वैचारिक गोंधळ उडू शकतो. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. आरामदायी दिवस घालवाल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल.

मकर (Capricorn) : कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल. अघळ पघळ बोलणे टाळा. इतरांचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. आज मन एकाग्र करा. शिक्षणात यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही सरकारी कामे पूर्ण होतील. नव्या उमेदीने आणि उमेदीने जीवनाच्या वाटेवर चाला.

Advertisement

कुंभ (Aquarious) : मनातील निराशा झटकून टाका. सकारात्मक विचारांची कास धरावी. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील. हातातील कामे पूर्ण होतील. नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. नवीन कार्य सुरू करू नका.

मीन (Pisces) : अडथळ्यातून मार्ग काढता येईल. दिरंगाई झाले तरी कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. आज तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. व्यवसायाचा विस्तार होईल.आज तुमची तब्येत चांगली राहील. प्रेमाच्या बाबतीत भावना त्रासदायक ठरू शकतात.
अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील.

Advertisement