SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘हे’ 18 धोकादायक ॲप्स? लगेच करा डिलीट..

केंद्र सरकारकडून बनावट ॲप्सना बॅन करण्याचं काम अगदी वेगात चालू आहे. देशात अनेक अँड्रॉइड ॲप्स लोक डाऊनलोड करतात आणि त्या ॲप्सचा वापर केला की त्यांची वैयक्तिक माहीती चोरली जाते. कारवाई देखील होते. मागील काही दिवसांमध्ये देखील Google Play Store वरून बरेच Android Apps गुगलने हटवले आहेत आणि हे काम सातत्याने सुरू असतं. पण तरीही आपण अलर्ट असणं आवश्यक आहे.

आता हाती आलेल्या माहीतीनुसार, काही संशोधकांनी अँड्रॉइड ॲप्सची एक यादीच तयार केली असून ती जारी करण्यात आली आहे, जी ॲप्स डेटा आणि पैसे चोरण्यासाठी मॅलिशियस टायटल वापरतात. हे असे ॲप्स तुमच्या स्मार्टफोनमध्येही असतील तर ते लवकरात लवकर तुम्हीही डिलीट/ Uninstall करा. कारण त्यापैकी अनेक ॲप्स हे अधिकृतपणे Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. पण काही नवीन ॲप्स प्ले स्टोअर ला लिस्ट झाले की त्यानंतर असे कृत्य करतात, म्हणून यासाठी काही वेळ गेल्यावर यूजरच्या रिव्ह्यू आणि तक्रारीमुळे समजतं. PhoneArena ने हा अहवाल जारी केला आहे.

Advertisement

मॅलिशियस अँड्रॉइड ॲप्स कोणते..?

▪️ Document Manager
▪️ Coin track Loan – Online loan
▪️ Cool Caller Screen
▪️ PSD Auth Protector
▪️ RGB Emoji Keyboard
▪️ Camera Translator Pro
▪️ Fast PDF Scanner
▪️Air Balloon Wallpaper
▪️ Colorful Messenger
▪️ Thug Photo Editor
▪️Anime Wallpaper
▪️Peace SMS
▪️ Happy Photo Collage
▪️Original Messenger
▪️ Pellet Messages
▪️ Smart Keyboard
▪️ Special Photo Editor
▪️ 4K Wallpapers

Advertisement

काय काळजी घेणार..?

▪️ गूगल सर्च करून कोणत्याही वेबसाईट्स वरून कोणतंही App डाउनलोड करू नका.
▪️ Google Play Store सारख्या विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरून ॲप्स डाऊनलोड करा. सध्या अँड्रॉइड साठी मोठा प्लॅटफॉर्म हाच आहे.
▪️ सरकारच्या सायबर सुरक्षा तज्ञांना सोशल मीडियावर फॉलो करा आणि जर त्यांनी काही टिप्स दिल्या तर संशय येणारे सर्व ॲप्स हटवा.
▪️ ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी डाऊनलोड्स पाहूनच नाही यूजर्सचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासून पाहा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement